esakal | कोरोनाच्या धास्तीने ग्रामस्थांचे शेतवस्त्यांवर स्थलांतर !
sakal

बोलून बातमी शोधा

माणुसकी संपली...कोरोनाच्या भीतीने बहिणीने भावाला घरातच केले बंदिस्त!

कोरोनाच्या धास्तीने ग्रामस्थांचे शेतवस्त्यांवर स्थलांतर !

sakal_logo
By
सुभाष होळकर

शिवना (जि.औरंगाबाद) : ग्रामीण भागात कोरोना महामारीने हाहाकार उडवलेला आहे. शुद्ध हवा मिळावी यासाठी, ग्रामीण भागातील नागरिक आता शेतवस्त्यांवर स्थलांतर करित आहेत. कोरोनाच्या धास्तीने ग्रामीण भागातील नागरिक शेतवस्त्यांवर निसर्गाच्या व गुराढोरांच्या सान्निध्यात राहायला पसंती देत आहेत. जीवनावश्यक वस्तूसह मोजकी कापड व काहींनी तर अख्खा संसार शेतवस्त्यांवर नेऊन निवासाची व्यवस्था केली आहे. निसर्गरम्य वातावरणात झाडाखाली, टीनपत्र्यांच्या शेडमध्ये वास्तव्य करून सकाळ व संध्याकाळची शुद्ध हवा घेऊन नागरिक मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र शिवना तालुका सिल्लोड परिसरात पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: सर ! माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, काय करू?

विविध माहितीसाठी फोन : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या वॉर रूममध्ये दररोज दहाहून अधिक नागरिक फोन करून कोरोना संदर्भात विचारणा करत आहेत. यात सर... माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, काय करू? कोठे बेड रिकामे आहेत. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन बेडची माहिता हवी आहे, अशी विचारणा करण्यात येत असून वॉर रूममधील कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. महिन्याभरापूर्वी जिल्‍हा परिषद विभागाच्यावतीने कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. ०-२४०-२९५४६१ या क्रमांकावर दररोज ग्रामीण भागातून नागरिक कोरोनासंदर्भात विविध माहितीसाठी फोन करत आहेत.

loading image