esakal | पुरुषांपेक्षा महिला सुरक्षित, कोरोनाबाधितांमध्ये संख्या निम्म्याने कमी

बोलून बातमी शोधा

null

पुरुषांपेक्षा महिला सुरक्षित, कोरोनाबाधितांमध्ये संख्या निम्म्याने कमी

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या काळात कामाशिवाय घराबाहेर न पडणाऱ्या महिलाच सुरक्षित आहेत. शहरात गेल्या १३ महिन्यांत ७४ हजार १३३ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून, यातील महिलांची संख्या कमी आहे. ४५ हजार ७६७ पुरुष तर २८ हजार ३६६ महिलांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच घरीच राहा सुरक्षित रहा, असा संदेश दिला जात आहे. पण घराबाहेर कामानिमित्त पडणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तेच कोरोना संसर्गाला बळी पडत आहेत. महापालिकेने मंगळवारी (ता.२०) दिलेल्या अहवालानुसार गेल्या १३ महिन्यांत शहरात एकूण ७४ हजार १३३ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून, यात ४५ हजार ७६७ पुरुष तर २८ हजार ३६६ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे घर सांभाळून घरीच राहणाऱ्या महिला पुरुषांपेक्षा सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी शहरात ६३१ रुग्ण आढळून आले होते. त्यात ४३६ पुरुष, तर १९५ महिलांचा समावेश होता.

हेही वाचा: मराठवाड्यात १५८ जणांचा मृत्यू; दिवसभरात वाढले सात हजार ४६८ कोरोनाबाधित

१८ ते ५० वयोगटातील सर्वाधिक रुग्ण

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण १८ ते ५० वयोगटातील आहेत. या वयोगटातील ४४ हजार ६४४ जण आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून हा आकडा वाढतच आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वयोगटानुसार पॉझिटिव्ह रुग्ण

-----

० ते ५ - १,१६५

५ ते १८ - ६,८६२

१८ ते ५०- ४४, ६४४

५० च्यापुढे -२१, ४६२