Aurangabad: लातुरात वेश्या व्यवसायावर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

लातुरात वेश्या व्यवसायावर छापा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : येथील अंबाजोगाई रस्त्यावरील अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने छापा टाकून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. एक जण फरार आहे. या प्रकरणात तिघांनाही बुधवारी (ता. दहा) न्यायालयासमोर उभे केले असता महिलेला एक दिवसाची पोलिस कोठडी तर इतर दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

येथील अंबाजोगाई रस्त्यावरील व्यंकटेश अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर १०२ मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांना मिळाली. मंगळवारी (ता. ९) पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. तेथे एका ३५ वर्षीय पीडित महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. यात पोलिसांनी पिडितेची सुटका केली. या प्रकरणी एका महिलेसह योगेश विश्वासराव हारके (वय ३६, रा. मजगेनगर), सूरज बालाजी कांबळे (वय २८, रा. सिद्धार्थ सोसायटी), उत्तरेश्वर पंचाप्पा हालगुंडे (रा. पानगाव) या चौघांच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १०) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

यात महिला व योगेश हारके व सूरज कांबळे या तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले. यात महिलेस एक दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले तर इतर दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक बावकर यांनी दिली. या छाप्यात पोलिसांनी २० हजार पाचशे रुपयांचे तीन मोबाईल व रोख तीन हजार २०० रुपये असा एकूण २३ हजार ७०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

loading image
go to top