esakal | लसीचे डोस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणे सौम्य, आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दावा

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Vaccination News

लस घेतल्यामुळे लक्षणे सौम्य होतात, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

लसीचे डोस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणे सौम्य, आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दावा
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी शहरात जम्बो लसीकरण मोहीम राबविली जात असून, ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घेऊन प्रतिसाद द्यावा. लस घेतल्यानंतर संसर्ग झाला तरी लक्षणे सौम्य असतात. जीवाला धोका निर्माण होत नाही, असा दावा महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी केला. लसीकरण मोहिमेबाबत माहिती देताना डॉ. पाडळकर म्हणाल्या, महापालिकेने मेगा लसीकरण मोहीम सुरु केली आहे. त्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. ११५ वॉर्डांमध्ये महापालिकेने लसीकरण केंद्र सुरु केले आहेत.

कोरोना बाधित शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, नातेवाईकांना संसर्ग होऊ नये म्हणून वीस किलोमीटर गेला पायी चालत

काल १०९ वॉर्डात केंद्र होते. जास्तीत-जास्त नागरिकांना लस देण्यासाठी माजी नगरसेवकांना आवाहन करण्यात आले आहे, त्यांची मदत होत आहे. सोमवारी (ता. पाच) पहिल्या दिवशी चार हजार जणांपेक्षा जास्त जणांना लस देण्यात आली. आज दुपारपर्यंत सुमारे तीन हजार नागरिकांनी लस घेतली. दोन डोस घेतल्यावर कोरोना होतो, मला स्वत:ला दोन डोसनंतर कोरोनाची लागण झाली होती. पण माझ्यात कोरोनाची लक्षणे सौम्य होती. त्यामुळे काही त्रास झाला नाही. आठ-दहा दिवसात बरी होऊन कामावर देखील रुजू झाले. लस घेतल्यामुळे लक्षणे सौम्य होतात, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

संपादन - गणेश पिटेकर