लसीकरण केंद्रांवर तोबा गर्दी, वाळूज परिसरात चेंगराचेंगरी

वाळूज परिसरातील (जि.औरंगाबाद) बजाजनगर येथील लसीकरण केंद्रावर सोमवारी झालेली चेंगराचेंगरी.
वाळूज परिसरातील (जि.औरंगाबाद) बजाजनगर येथील लसीकरण केंद्रावर सोमवारी झालेली चेंगराचेंगरी.
Updated on
Summary

प्रत्येक केंद्रावर लसीचे सरासरी १०० डोस येतात. मात्र, लस घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या सर्वच ठिकाणी तोबा गर्दी झाली होती.

वाळूज (जि.औरंगाबाद) : मागणीपेक्षा लशींचा पुरवठा Corona vaccine supply कमी होत असल्याने वाळूज परिसरातील Waluj लसीकरण केंद्रांवर Corona vaccination sites नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बजाजनगर येथील आरोग्य उपकेंद्रावर सोमवारी (ता. २८) ढकलाढकली होऊन चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला. गर्दीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण झाल्याने काही वेळ लसीकरण थांबवावे लागले. कोरोना संसर्गाची Corona तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाचा कल कोविड प्रतिबंधक लस घेण्याकडे आहे. परिणामी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. वाळूज परिसरात दौलताबाद व जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत लसीकरण सुरू आहे. सोमवारी बजाजनगर, पंढरपूर, सिडको वाळूज महानगर Cidco Waluj Mahanagar , वाळूज व रांजणगाव येथील आरोग्य उपकेंद्र व जिल्हा परिषद शाळा येथे लसीकरण सुरू होते. प्रत्येक केंद्रावर लसीचे सरासरी १०० डोस येतात. मात्र, लस घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या सर्वच ठिकाणी तोबा गर्दी झाली होती. बजाजनगर Bajajnagar येथे लसीकरणासाठी रांगा लागल्या होत्या. जो तो टोकन घेण्यासाठी चढाओढ करत होता. त्यामुळे एकच गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली. ही माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी Aurangabad धाव घेतली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.aurangabad live news crowds at corona vaccination sites in waluj area

वाळूज परिसरातील (जि.औरंगाबाद) बजाजनगर येथील लसीकरण केंद्रावर सोमवारी झालेली चेंगराचेंगरी.
एकदा तरी लडाखला भेट द्याच, पाहा PHOTOS

पंढरपूर येथे आरोप-प्रत्यारोप

पंढरपूर येथील लसीकरण केंद्रावर सकाळी सहापासूनत मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र, येथे केवळ ७० डोस उपलब्ध झाले. गर्दीतील लोकांना त्याचे टोकण वाटण्यात आले. अनेकांना टोकन न मिळाल्याने त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यामुळे येथे गोंधळ उडाला होता. याबाबत पंढरपूरचे माजी सरपंच शेख अत्तर म्हणाले, की आमच्या केंद्रावर गावातील लोकापेक्षा बाहेरगावातील लोकांचीच जास्त गर्दी होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करता येत नाही. आरोग्य विभागाने व्यवस्थित नियोजन करून त्या त्या गावातील लसीकरण केंद्रावर नियोजन करावे.

रांजणगाव येथे व्यत्यय

रांजणगाव (शेणपुंजी) येथे जिल्हा परिषद शाळा व आरोग्य उपकेंद्र या दोन ठिकाणी लसीकरणाचे केंद्र आहे. येथे प्रत्येकी १०० प्रमाणे २०० लसींचे डोस उपलब्ध झाले. मात्र, लस घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गर्दीत प्रत्येक जण पुढे येत असल्याने काम करणे मुश्कील झाले. त्यामुळे काही वेळ या केंद्रावरील लसीकरण थांबवावे लागल्याचे आरोग्य सेविका रुपाली अधापुरे यांनी सांगितले.

पुरवठा कमी - डॉ. संग्राम बामणे

दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संग्राम बामणे यांनी सांगितले, की लस घेणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, मात्र त्या तुलनेत लस उपलब्ध नाही. सोमवारी ३०० डोस उपलब्ध झाले होते. त्यापैकी दौलताबाद येथे ९०, सिडको वाळूज महानगर येथे ७०, बजाजनगर येथे ७० व वडगाव येथे ७० असे विभागून देण्यात आले होते. बजाजनगर येथे झालेली गर्दी लक्षात घेता आणखी १०० डोस उपलब्ध करण्यात आले. तरीही शेकडो नागरिक लसीविनाच राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com