
विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला केशर आंब्यांची आरास
पैठण (जि.औरंगाबाद) : संत एकनाथ महाराजांच्या (Saint Eknath Maharaj) गावातील वाडा मंदिरात अक्षय तृतीयाच्या (Akshay Tritiya) मुहूर्तावर शुक्रवारी (ता.१४) नाथ महाराजांच्या पूजेतील विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला (Vijayi Pandurang) केशर आंब्यांची आरास परंपरेनुसार करण्यात आली. पुराणातील कथेनुसार, अक्षय तृतीयेच्या याच दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भक्त सुदामा यांची भेट झाली होती. अक्षय तृतीयापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता, चारधाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात. याच दिवशी नर-नारायण यांचे अवतरण झाले होते, त्रेतायुगातच महाभारत घडले होते. याच युगात जगत्कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतार घेऊन प्रकट झाले होते आणि कालातीत किंवा त्रिकालाबाधीत सत्य असलेल्या भगवत गीतेची अमृतवाणी प्राप्त झाली. (Aurangabad Live News Mango Decoration Before Vijaya Panduranga In Paithan)
हेही वाचा: साखर कारखान्यात देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प सुरु, मुख्यमंत्री ठाकरेंनी केले उद्घाटन
वैशाख महिना हा खूपच उष्ण असतो. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करण्याची पध्दत आहे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षयतृतीयापासून खाण्यास रुचकर असतो. अक्षयतृतीयाला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठण अखंड टिकून राहते. या निमित्ताने नाथवंशजांच्या प्रथा, परंपरेनुसार नाथवंशजांनी नाथांच्या वाडा मंदिरात सकाळी काकड आरती व विधीपूजन करुन मूर्तीला केशर आंब्याची आरास केली. यावेळी नाथवंशज चैतन्य महाराज गोसावी, विनित गोसावी, पुष्कर गोसावी, दिवाकर गोसावी, हरीपंडित गोसावी आदी उपस्थित होते.
Web Title: Aurangabad Live News Mango Decoration Before Vijayi Pandurang In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..