esakal | Aurangabad: पिकांमध्ये निलगायींचे धुडगूस, शेतकऱ्यांमध्ये दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

शिवना (ता. सिल्लोड) : परिसरात पेरलेल्या शेतांमध्ये फिरणारा निलगायींचा कळप.

Aurangabad: पिकांमध्ये निलगायींचे धुडगूस, शेतकऱ्यांमध्ये दहशत

sakal_logo
By
सुभाष होळकर

शिवना (जि.औरंगाबाद) : रोहिणी नक्षत्रानंतर गेल्या महिन्याभरापासून पाऊसच नसल्याने दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या शिवना (ता.सिल्लोड) Sillod परिसरात अल्पशा पावसावर उगवून आलेली पिके सुकू लागली आहेत. या पिकांमध्ये आता निलगायी Nilgai आणि हरणांच्या कळपांनी धुडगूस घातल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. वन विभागाने Forest Department या प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यास किंवा त्यांना हुसकावून लावण्यास शासनाची बंदी Aurangabad आहे. शेतकऱ्यांकडून एखाद्या प्राण्यास इजा पोहोचल्यास वन विभाग शेतकऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करतो. त्यामुळे शेतकरी वर्गात Farmer दहशतीचे वातावरण आहे.aurangabad live news nilgai damages crops in sillod tahsil

हेही वाचा: भागवत कराडांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदाचा स्वीकारला पदभार

वनविभाग आणि वन्यजीव कायद्याच्या बडग्यामुळे शेतकऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे. अजिंठा डोंगररांगांच्या Ajantha Mountain Range उत्तरेकडील टापूत पाऊसच नसल्याने या मुक्या जीवांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. वनविभागाने जंगलात तयार केलेल्या कृत्रिम जलसाठ्यांमध्ये जनावरांसाठी टँकरने पाणी ओतून पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था केली, तर ही जनावरे डोंगर पट्टा सोडून शेतकऱ्यांच्या शेतात घुसणार नाही. वन विभागाने या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

हेही वाचा: Hingoli : हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस, पहाटेपासून सुरूवात

दुष्काळी परिस्थितीमुळे वन्यजीवांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. बांधलेल्या जलसाठ्यात पाणी सोडण्याची सुविधा केली आहे. शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यास इजा पोहोचवू नये. झालेल्या मालाच्या नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल.

- एस. पी. मांगदरे, वनपरीक्षेत्र अधिकारी, अजिंठा.

loading image