esakal | पहिलीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा सर्पदंशाने जागीच मृत्यू

बोलून बातमी शोधा

पहिलीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा सर्पदंशाने जागीच मृत्यू
पहिलीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा सर्पदंशाने जागीच मृत्यू
sakal_logo
By
सुभाष होळकर

शिवना(जि.औरंगाबाद) : कडब्याच्या गंजीमध्ये पिकवण्यासाठी ठेवलेले आंबे (Mango) काढण्यासाठी गेलेल्या एका बालकाच्या हाताला गंजीत दडुन बसलेल्या सापाने दंश (Snake Bite) केला. यात या बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शिवना (ता. सिल्लोड) (Sillod) येथील भोपळेवाडी शेत वस्तीवर मंगळवारी (ता.चार) सकाळी नऊला घडली. ईश्वर ज्ञानेश्वर मोकासरे (वय ७) असे मृत बालकाचे नाव आहे. (Aurangabad Live Updates Child Dies Due To Snake Biting In Shivna Sillod)तो पहिल्या वर्गात शिकत होता.

हेही वाचा: बंगालच्या निकालाने भाजपचा ग्राफ लागला उतरणीला : इम्तियाज जलील

येथील शेतकरी ज्ञानेश्वर सांडू मोकासरे यांचा तो मुलगा होता. शेतवस्तीवर राहत असल्याने त्याने कडब्याच्या (मकाचा चारा) सुडीमध्ये आंबे पिकवण्यासाठी ठेवलेले होते. त्यात हात घालून आंबे काढत असताना ही दुर्दैवी घटना घडली. सर्पदंश एवढा खतरनाक होता की त्याचा जागीच मृत्यु झाला. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.