esakal | Gudi Padwa 2021: पाडव्याच्या उत्साहावर संक्रांत! अडीचशे ते तिनशे कोटींच्या उलाढालीवर परिणाम 

बोलून बातमी शोधा

Gudi Padwa 2021 News

'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. आज दुकाने सुरु करण्याचा प्रयत्न केला,मात्र पोलिसांनी बंद करण्याच्या सूचना केल्या.

Gudi Padwa 2021: पाडव्याच्या उत्साहावर संक्रांत! अडीचशे ते तिनशे कोटींच्या उलाढालीवर परिणाम 
sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : साडेतीन मुहुर्तांपैकी एक सण असलेल्या गुढी पाडव्याला घर, वाहन आणि सोने खरेदी केली जाते. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनाच्या सावटाखालीच हा उत्सव साजरा होणार आहे. गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर चारचाकींची साडेचारशे आणि दुचाकींची अडिच हजारहून अधिक विक्री होत असते. यंदाही तेवढीच बुकिंग झाली असून, लॉकडाऊनमुळे या वाहनांचे वितरण आता लॉकडाऊननंतर मिळणार आहे.

सकाळी सुरू अन् दुपारी बंद! व्यापारी महासंघ म्हणते, आस्थापना सुरु ठेवा 

यामुळे बाजारपेठेत अडीचशे ते तिनशे कोटींच्या उलाढालीवर परिणाम होणार असल्याची माहिती पगारिया अटोमोबाईलचे विक्रेते राहुल पगारिया यांनी दिली. पाडव्याच्या महुर्तावर बुकिंगसाठी काही शोरूम चालकांनी ऑनलाईनची सुविधा केली आहे. कोरोना आल्यापासून चारचाकी वाहनांच्या विक्री वाढली असून मागणीही वाढली आहे, असेही श्री. पगारिया म्हणाले. 

Corona Updates: चिंताजनक! औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पार

सोने-चांदीतील उलाढालीवर परिणाम 
'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. आज दुकाने सुरु करण्याचा प्रयत्न केला,मात्र पोलिसांनी बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे सराफा दुकाने बंद ठेवली. गेल्यावर्षीही १५ कोटीची उलाढाल ठप्प झाली होती. यंदाही तीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. शहर व जिल्ह्यातील सराफा व्यवसायिकांचे १५ ते २० कोटींचे नुकसान होणार आहे. दुकाने सुरु झाल्यास ४ ते ५ कोटींची उलाढाल होईल, असे सराफा असोसिएशनचे राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले. 

औरंगाबादेत कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक, तब्बल १४ हजार २५७ जण कोरोनामुक्त

आज दीडशे जणांचे  होणार गृहप्रवेश 
पाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी शंभरहून अधिक गृहप्रवेश होत असतो. यंदा राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटी कमी केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची बुकिंग झाली. पाडव्याच्या दिवशी १०० हून अधिक घरांची बुकिंग होईल. तर १५० लोकांचे गृहप्रवेश होणार आहेत, अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्रसिंग जाबिंदा यांनी सांगितले. 

संपादन - गणेश पिटेकर