esakal | जोरदार वादळी वाऱ्याने घरांची पडझड,औरंगाबाद तालुक्यात एक जण जखमी

बोलून बातमी शोधा

null

जोरदार वादळी वाऱ्याने घरांची पडझड,औरंगाबाद तालुक्यात एक जण जखमी

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडूळ (जि.औरंगाबाद) : घारेगाव- एकतुनी (ता.औरंगाबाद) शिवारात मंगळवारी (ता.२७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड होऊन घरांवरील पत्रे उडाली असून पत्रावरील दगड खाली पडल्याने दगड लागून एक जण जखमी झाला आहे. घारेगाव-एकतुनी शिवारात आज सायंकाळी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे येथील अनेक घरावरील पत्रे उडाल्याने ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली होती. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा: सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

पाऊस पडला नसून फक्त जोरदार वाऱ्याने मोठे नुकसान झाले. येथील बाबुराव वाघमारे, कचरू वाघमारे, विलास वाघमारे, सदानंद वाघमारे, लिलाबाई वाघमारे, संदीपान वाघमारे, साहेबराव वाघमारे, रामेश्वर वाघमारे, प्रभुदास वाघमारे, दयानंद वाघमारे यांच्या घरावरील पत्रे उडून बऱ्याच अंतरावर जाऊन पडली. तसेच लिंबाच्या झाडाच्या फांद्याही मोडल्या. दयानंद वाघमारे यांना घरावरील दगडाचा मार लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्य अभिलेष वाघमारे, सेवक वाघमारे यांनी तात्काळ नागरिकांना सुखरुप ठिकाणी हलविल्यासाठी मदतकार्य केले. घारेगाव परिसरात विजेच्या खांबावरील तारा ठिक-ठिकाणी तुटल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.