esakal | मांगवीर बाबांची यात्रा कोरोनामुळे सलग दुसर्‍या वर्षीही रद्दच

बोलून बातमी शोधा

null
मांगवीर बाबांची यात्रा कोरोनामुळे सलग दुसर्‍या वर्षीही रद्दच
sakal_logo
By
संतोष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : महाराष्ट्र राज्यासह परराज्यातही प्रसिद्ध असलेली शेंद्रा कमंगर (ता.औरंगाबाद) येथील श्री क्षेत्र मांगवीर बाबा देवस्थानची यात्रा सलग दुसर्‍या वर्षीही कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. येत्या एक मे पासुन पुढील पाच दिवस ही यात्रा भरणार होती. देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (ता.23) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गजन्य रोगाची साथ पसरू नये म्हणून सलग दुसर्‍या वर्षीही मांगवीर बाबांची यात्रा भरणार नसल्याचे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले. या संदर्भात शुक्रवारी शेंद्रा येथे देवस्थान समितीच्या कार्यालयात समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक घेण्यात आली. यात यात्रा भरणार नसल्याचा निर्णय झाल्याचे समितीचे सचिव सुरेश नाईकवाडे यांनी सांगितले.

हेही वाचा: जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला

तत्पूर्वी, मागील आठवड्यापासुन देवस्थान समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, तहसील व पोलिस प्रशासनाशी थेट भेट व पत्रव्यवहार सुरू होता. आज फक्त याबाबत समिती सदस्यांकडे प्रशासनाचा काय निर्णय आहे. यावर सकारात्मक चर्चा करण्यात येऊन हा एकमुखी निर्णय घेतला गेला. दरम्यान, यात्रा भरणार नसली तरी मुहूर्तावर बाबांची आरती व नैवद्याबाबत चर्चा करण्यात आली. समितीच्या वतीने यात्रा काळात सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना महामारीबाबत लसीकरण व काय काळजी घेतली पाहिजे याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे समिती अध्यक्ष भास्कर कचकुरे यांनी सांगितले. यात्रा रद्द करण्यात आल्याने राज्यासह परराज्यातून येणार्‍या भाविकांनी याची नोंद घेण्याचे आवाहनही या पत्रकात करण्यात आले आहे. या पत्रकावर अध्यक्ष भास्कर कचकुरे , सचिव सुरेश नाईकवाडे यांच्यासह सदस्य वैजिनाथ मुळे, किशोर शेजुळ, कडुबा कुटे, साळुबा कचकुरे यांच्या सह्या आहेत.