मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे आंदोलन; काळे झेंडे लावून 'महाविकास',भाजपचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी काळे झेंडे लावून महाविकास आघाडी व भाजपचा निषेध केला.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे आंदोलन; काळे झेंडे लावून 'महाविकास',भाजपचा निषेध

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाला (Supreme Court Verdict On Maratha Reservation) देण्यात आलेले शिक्षण व नोकरीतील आरक्षण रद्द झाले. त्यानंतर राज्य सरकार काही तरी पावले उचलेल असे अपेक्षा होती. मात्र महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजपमध्ये (BJP) हेवेदावे सुरू आहेत. या राजकीय पक्षांचा निषेध करत आज बुधवारी (ता.१२) मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) समन्वयकांनी घरावर काळे झेंडे लावत आंदोलन केले. जोपर्यंत पर्याय पावले उचलले जात नाही तोपर्यंत घरावर निषेधाचे काळे झेंडे राहतील, असे आंदोलनकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी सांगितले.मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अभिजीत देशमुख, अप्पासाहेब कुढेकर, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे व इतर समाज बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनानंतर विनोद पाटील यांनी त्यांच्या घरासमोर हा काळा ध्वज लावला. (Aurangabad Live Updates Maratha Kranti Morcha Coordinators Agitation Against Mahavikas, BJP)

हेही वाचा: जाणून घ्या, उत्तर प्रदेशातील काही सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यानांविषयी

आंदोलनात महाविकास आघाडी सरकार व भाजप विरोधात जोरदार घोषणा देण्यात आली. या प्रसंगी श्री.पाटील म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयात निकाल लागल्यानंतर राज्य सरकार काहीतरी पावले उचलेल असे वाटले होते. मात्र भाजप व महाविकास आघाडी यांच्यात हेवेदावे सुरू आहेत. हा कायदा चुकीचा होता तर मग शिवसेनेच्या आमदारांनी व महाविकास आघाडीने मतदान का केले? भाजपने केलेला कायदा योग्य असेल, तर भाजपतर्फे राज्य सरकारवर दबाव आणून पर्यायी व्यवस्था देण्याविषयी का सांगण्यात येत नाही. केंद्राकडे चर्चा करून राज्य सरकारला सांगून आरक्षणाबाबत पर्यायी व्यवस्था का करण्यासाठी हालचाली होत नाहीत, असा सवालही याचिकाकर्ते पाटील यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी आणि भाजपचा या राजकारणाचा निषेध करण्यासाठी समाजबांधवांनी निर्णय घेतला व स्वतःच्या घरापासून काळात ध्वज लावून या घटनेचा निषेध आम्ही करत आहोत. जोपर्यंत पर्यायी व्यवस्था मिळत नाही, तोपर्यंत घरावर असलेला हा काळा ध्वज तसाच राहील असेही श्री. पाटील म्हणाले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी व 2014 ते 2019 पर्यंत नोकरीतील रुजू करणाऱ्यांचा प्रश्न असेल शैक्षणिक पीस मधील सवलतीचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न राज्य सरकार सोडवू शकते. मात्र सरकारकडून हे प्रश्न सोडवण्याविषयी कुठल्याच हालचाली होत नाहीत. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज कोरोनाच्या नियमाचे पालन करत हे आंदोलन केले, असे श्री.पाटील म्हणाले.

Web Title: Aurangabad Live Updates Maratha Kranti Morcha Coordinators Agitation Against Mahavikas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top