जाणून घ्या, उत्तर प्रदेशातील काही सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यानांविषयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य

जाणून घ्या, उत्तर प्रदेशातील काही सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यानांविषयी

एकापेक्षा एक पाहण्यासारखे राष्ट्रीय उद्याने उत्तर प्रदेशात आहेत. अशाच काही वन्यजीव अभयारण्यांविषयी (Wildlife Sanctuary) जाणून घेऊ या(Famous National Parks In Uttar Pradesh)

चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य (Chandraprabha WildLife Sactuary)

वाराणसीपासून साधारण ७० किलोमीटर अंतरावर एक सर्वोत्तम आणि चांगले चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य आहे. हे चंदौली जिल्ह्यात आहे. ब्लॅकबक्स, सांभर, नीलगाय, जंगली डूकर आदी पाहता येऊ शकते. विशेषतः उद्यानातील राजदारी नदी आणि देवदारी धबधबा पाहण्यासारखे आहे.

हेही वाचा: 'शरद पवारांनी किती फडांवर जावून कुस्त्या खेळल्या, हेही सांगावं'

पीलिभीत टायगर रिझर्व्ह

पीलिभीत टायगर रिझर्व्ह

२.पीलिभीत टायगर रिझर्व्ह (Pilibhit Tiger Reserve)

देशात खूप कमी असे अभयारण्य आहेत जे टायगर रिझर्व्ह पार्क म्हणून ओळखले जातात. एका अंदाजानुसार साधारण भारतात जवळपास ४१ वाघ संरक्षक उद्याने आहेत. त्यापैकी एक म्हणजे पीलिभीत टायगर रिझर्व्ह पार्क. साधारण आठसे किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या या उद्यानात काही दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले वाघ, बिबट्या, हरिण आदी प्राणी आहेत. पक्षी निरीक्षकांसाठी हे उद्योन सर्वोत्तम आहे. येथे जवळपास १३० पेक्षा अधिक प्राणी, ५५० पक्षी आणि दोन हजार वनस्पतींच्या प्रजाती आढळतात.

३.राष्ट्रीय चंबळ अभयारण्य (National Chambal Sanctuary)

या राष्ट्रीय उद्यानाची ओळख करुन देण्याची गरज नाही. हे उद्यान कासवांचे घर म्हणून लोकप्रिय आहे. येथे ८ पेक्षा अधिक कासवांच्या प्रजाती आढळत असल्याचे सांगितले जाते. देशातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक असलेल्या चंबळ नदीच्या काठावर जवळपास ३०० पेक्षा अधिक परदेशी पक्ष्यांचे हे घर आहे.

४.कैमूर वन्यप्राणी अभयारण्य (Kaimur Wildlife Sanctuary)

हे अभयारण्य आजही उत्तर प्रदेशसह बिहारवासीयांसाठी एक सर्वोत्तम आणि सुंदर उद्यान आहे. बिहारच्या सीमावर्ती भागात असलेल्या या पार्कमध्ये मृग, नीलगाय, ब्लॅकबक, चिंकारा यासह इतर प्राणी आहेत. जवळपास पाचशे पेक्षा अधिक क्षेत्रफळावर ते पसरले आहे. ब्राह्मण बदक, लाल शंकुधारी शिकारी, पिटेल असे नामशेष होणारे पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात.

Web Title: Famous National Parks In Uttar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top