esakal | औरंगाबादेत आज फक्त १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

औरंगाबादेत आज फक्त १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरण

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी (ता. सात) फक्त १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी सहा केंद्रांवर लसीकरण सुरू राहील. त्यामुळे आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षावरील व्यक्तींनी लसीकरण केंद्रावर (Corona Vaccination Site) गर्दी करू नये, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Aurangabad Municipal Corporation) कळविले आहे. लसीकरणाबाबत काही शंका असल्यास ८९५६३०६००७ या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारच्या लसीकरण सत्राची नोंदणी झाल्याचा एमएमएस प्राप्त झालेल्या नागरिकांनीच खालील केंद्रावर यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Aurangabad Live Updates Today Only 18 to 44 Years Old People Get Vaccination)

हेही वाचा: मराठवाड्यात नवे सहा हजार ७३८ कोरोना रुग्ण, १६८ जणांचा मृत्यू

कोविशिल्ड लसीकरण केंद्र

-सादातनगर महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र

-कैसर कॉलनी महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र

-मुकुंदवाडी महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र

कोव्हॅक्सीन लसीकरण केंद्र

-चेतनानगर महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र

-क्रांती चौक महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र

-गणेश कॉलनी महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र