esakal | गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांवर रानडुकरांचे हल्ले सुरुच, महिला गंभीर जखमी

बोलून बातमी शोधा

Wild Pigs Attack In Beed District
गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांवर रानडुकरांचे हल्ले सुरुच, महिला गंभीर जखमी
sakal_logo
By
नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : शेंदूरवादा (ता.गंगापूर) परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. एकाच आठवड्यात कोडापुर येथील परसराम करपे (वय २५) या शेतकऱ्यावर शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला करून जखमी केले. शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी तांदुळवाडी येथील एका महिलेवर तीन वराहने हल्ला केला. त्यात सदरची महिला गंभीर जखमी झाली असून सदरील महिलेवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.याविषयी मिळालेल्या माहितीनुसार शेंदुरवादा भागात असलेल्या तांदुळवाडी गावातील महिला शकुंतलाबाई लक्ष्मण शिंदे (वय ५५) या तांदुळवाडी शिवारातील स्वतःचा गट क्रमांक १०२ पिकांना दुपारच्या वेळेत पाणी देण्याचे काम करीत असताना अचानक तीन डुकरांनी सदर महिलेवर हल्ला केला.

हेही वाचा: स्वातंत्र्य सैनिकाने जिंकला ९५ व्या वर्षी कोरोनाविरोधातील लढा, कोरोनावर मात

त्यात महिलेच्या हाताला चावा घेतल्याने त्यांचा हात रक्तबंबाळ झाला. त्यामुळे सदर महिला घटनास्थळीच आरडाओरड करत बेशुध्द पडल्या होत्या. त्यांच्या आवाजाने संदीप विधाते, दीपक शिंदेसह आसपासचे शेतकरी धावत येऊन पाहिले असता रानडुकरांनी महिलेवर हल्ला करून चावा घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदरील महिलेस उपचारासाठी तात्काळ त्यांनी बिडकीन येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. उन्हाळी पिके कशी जगवावी ही चिंता आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. या रानडुकरांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्य कृष्णा सुकासे, योगेश शेळके, उपसरपंच ताराचंद दुबिले, कारभारी दुबिले, सचिन विधाते, आनंदा निकम, पोलिस पाटील गोविंद मगर, शिवाजी काळे, संतोष विधाते, गणेश विधाते, कल्याण विधाते, माजी सरपंच लतीफ शहा, विकी रंधवे, नवनाथ दुबिले, सरपंच विठ्ठल राऊत, गणेश शेळके, त्र्यंबक काळे आदी ग्रामस्थांनी केली आहे.