मराठवाडा इको बटालियनला पाच वर्षांची मुदतवाढ

हरित आच्छादन वाढवा : मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Aurangabad Marathwada Eco Battalion extension of five years
Aurangabad Marathwada Eco Battalion extension of five yearssakal

औरंगाबाद : राष्ट्रीय वन धोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक आहे. तथापि महाराष्ट्रात सध्या हे प्रमाण २० टक्के आहे. कमी वृक्षाच्छादन आहे तिथे इको बटालियनच्या मदतीने हरित क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत यासाठी औरंगाबाद येथील पहिल्या इको बटालियन कंपनीला आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी तसेच अतिरक्त दोन इको बटालियन कंपनीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचा तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानातील समिती कक्षात इको बटालियनच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, नवी दिल्लीचे प्रादेशिक सेना महासंचालक लेफ्टनंट जनरल पी. एम. सिंग, औरंगाबादच्या इको बटालियनचे  कमांडिंग ऑफीसर प्रादेशिक सेनेचे (इकॉलॉजी) कर्नल  मन्सुर अली खान उपस्थित होते.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या रंगांची, फुलांची झाडे फुलतात. यासाठी डोंगर रांगामध्ये वृक्षलागवड करतांना अशा स्थानिकरित्या फुलणाऱ्या विविधरंगी फुलांच्या वृक्षांची ‘व्हॅली’ तयार करता येऊ शकेल का याचाही वनविभागाने अभ्यास करावा. असे करतांना येथेही पक्ष्यांची अन्नसाखळी अबाधित राहील, तिथे वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर वाढेल हे पहावे. शहरामधील हरित क्षेत्र वाढवण्याच्यादृष्टीने सामाजिक वनीकरण विभागामार्फत प्रत्येक महापालिका क्षेत्रात जागेच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त जागांवर मियावाकी वन विकसित करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

औरंगाबाद इको बटालियनने लावली ६६२ हेक्टरवर झाडे

औरंगाबाद इको बटालियनने गेल्या पाच वर्षात ६६२ हेक्टरक्षेत्रावर सुमारे ८ लाख ७१ हजार ४७७ झाडे लावली आहेत. यात रोपे जगण्याचे प्रमाण सरासरी ८९.५४ टक्के इतके असल्याची माहिती कर्नल मन्सूर अली खान यांनी यावेळी दिली. सध्या इको बटालियनच्या रोपवनात २.५० लाख रोपे तयार आहेत. इको बटालियनमधील सैनिक रोप लागवडीपासून त्यांच्या संरक्षणापर्यंतची काळजी घेत असल्याने वृक्ष जगण्याचे प्रमाण अधिक आहे. हे काम करत असतांना त्यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या वन्यजीव संरक्षणाचेही काम होत असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com