
औरंगाबाद : एक लाख हेक्टरवर पेरणी
औरंगाबाद : मराठवाड्यात पाऊस लांबल्याने त्याचा फटका पेरणीला बसला आहे. आतापर्यंत जो पाऊस झाला त्यावर मराठवाड्यात २० जूनपर्यंत जवळपास १ लाख ८ हजार ५९९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या अनेक भागांत आता पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात सर्वाधिक २९ हजार ९३ हेक्टरवर तर त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात २७ हजार ८३१ हेक्टर, औरंगाबाद जिल्ह्यात २० हजार ८२८ हेक्टर, बीड १६ हजार ४३६ हेक्टर, परभणी ११०६३ हेक्टर, उस्मानाबाद ३२५८ हेक्टर तर लातूर जिल्ह्यात केवळ ९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी उरकली आहे.
हिंगोली जिल्ह्यात अजून दखलपात्र पेरणी सुरू झाली नसल्याची स्थिती आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक १३ हजार ८९३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. गंगापूर तालुक्यात ३०२२ सोयगाव २४७६ हेक्टरवर खरीप पेरणी उरकली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक १३ हजार ७४० हेक्टरवर कपाशी तर ५ हजार ७६२ हेक्टरवर मका लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. जालना जिल्ह्यात एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी तब्बल २६ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.
जालना जिल्ह्यात एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी तब्बल २६ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. बदनापूर, जाफराबाद आदी तालुक्यांत पेरणी पुढे असून त्यापाठोपाठ घनसावंगी, अंबड आदी तालुक्यांत २ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात सर्वाधिक ७ हजार ९४ हेक्टरवर तर आष्टी तालुक्यात ३८५० हेक्टरवर, गेवराई २६३४, परळी १७४८ हेक्टरवर खरिपाची पेरणी उरकली आहे. इतर तालुक्यांत १०० ते ३०० हेक्टरदरम्यान पेरणी उरकली असून केज आणि पाटोदा तालुक्यात अजून पेरणी सुरू झाली नसल्याचे कृषी विभागाने कळविले.
Web Title: Aurangabad Marathwada One Lakh Hectare Kharif Sowing Lack Of Rainfall
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..