esakal | Aurangabad: न्याय मागण्यांसाठी ‘मार्ड’च्या डॉक्टरांचा घाटीत कॅंडल मार्च
sakal

बोलून बातमी शोधा

कॅंडल मार्च

औरंगाबाद : न्याय मागण्यांसाठी ‘मार्ड’च्या डॉक्टरांचा घाटीत कॅंडल मार्च

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : न्याय मागण्यांसाठी ‘मार्ड’च्या डॉक्टर तीन दिवसांपासून राज्यभर संपावर आहेत. औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातही निवासी डॉक्टर संपावर आहेत. शनिवारी (ता. २) झालेल्या आंदोलनानंतर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी (ता. ३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कॅंडल मार्च या डॉक्टरांनी काढला. सोमवारी (ता. ३) दुपारी साडेतीनपासून कोविड व आयसीयू वगळता अत्यावश्‍यक सेवेबाबतही संप पुकारण्यात येणार असल्याचेही ‘मार्ड’तर्फे सांगण्यात आले आहे.

वैद्यकीय शुल्क माफ करावे, वसतिगृहातील समस्या दूर करावी, डॉक्टरांना रुग्णसेवा करण्यासाठी घाटीत चांगले वातावरण तयार करावे.

हेही वाचा: औरंगाबाद : शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण अनिवार्य

मानधनात वाढ करावी, आदी मागण्यांसाठी एक सप्टेंबरपासून ‘मार्ड’चे डॉक्टर्स संपावर आहेत. घाटीतील निवासी डॉक्टरांनी संपाच्या दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अधीक्षक कार्यालय ते मेडिसीन इमारतीपर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर आज सायंकाळी मेडीसीन बिल्डिंग ते घाटीचे मुख्य प्रवेशद्वारापर्यंत कॅंडल मार्च काढण्यात आला. यावेळी निवासी डॉक्टरांची मोठी उपस्थिती होती. घाटी प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या पाठविण्यात आल्या. परंतु त्यावर कोणतेही उत्तर अजून मुख्यमंत्री अथवा राज्य शासनाकडून आले नसल्याचेही घाटी प्रशासनाने संपकरी डॉक्टरांना सांगितले आहे.

‘आयसीयू’, कोविड सेवा राहतील सुरू

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे ‘ओपीडी’ मधून भरपूर रुग्ण बाहेर गेले असून तेथील रुग्णांची हेळसांड होत आहे. पण रुग्णांना धोका होणार नाही. एखाद्याला रुग्ण सेवेपासून वंचित व्हावे लागेल, असे कोणतेही कृत्य झाले नाही. याशिवाय आयसीयू व कोविड सेवा सुरु राहतील. परंतु इतर अत्यावश्‍यक सेवा सोमवारी दुपारपासून बंद ठेवू असा पावित्रा संपकरी निवासी डॉक्टरांनी घेतला.

loading image
go to top