औरंगाबाद: आजपासून ‘मातृ वंदना सप्ताहा’ला सुरुवात

पहिल्या अपत्यासाठी मातांना मिळणार पाच हजार रुपये
औरंगाबाद: आजपासून ‘मातृ वंदना सप्ताहा’ला सुरुवात
sakal

औरंगाबाद : जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर दरम्यान प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत ‘मातृ वंदना सप्ताह’ राबविण्यात येत आहे. यात योजनेचा लाभ शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळता इतर सर्व मातांना पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यात पाच हजार रुपये देण्यात येणार आहे.

औरंगाबाद: आजपासून ‘मातृ वंदना सप्ताहा’ला सुरुवात
संततधार पावसामुळे पैठणमधील पाचोडसह परिसरातील पिके पाण्याखाली

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून १ सप्टेंबर २०१७ ला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेतर्गत १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत वेगवेगळ्या स्तरावर पोष्टर प्रदर्शन आणि पथनाट्याच्या माध्यमातून प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे.

तसेच विविध स्तरावर लाभार्थ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टिने शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोकर यांनी सांगितले. या योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने कार्यक्षेत्रातील आशा, अंगणवाडी, आरोग्य सेविका किंवा कोणत्याही जवळच्या सरकारी दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पात्र महिलांनाच मिळेल लाभ

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत १ जानेवारी २०१७ रोजी अथवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली आहे. किंवा गर्भ धारणा झाली आहे आणि त्यांनी शासनाच्या अधिसूचित केलेल्या आरोग्य संस्थेत नोंदणी केली असेल पात्र महिलांना प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी देण्यात येतो.

औरंगाबाद: आजपासून ‘मातृ वंदना सप्ताहा’ला सुरुवात
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार;पाहा व्हिडिओ

सदर लाभ हा तीन टप्प्यात अदा करण्यात येणार असून पहिला टप्पा १ हजार पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसात आरोग्य संस्थेत नोंदणी केल्यानंतर देण्यात येतो, दुसरा टप्पा २ हजार प्रसूती पूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो. व तिसरा टप्पा २ हजार प्रसूती पश्चात झालेल्या अपत्याचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com