esakal | संततधार पावसामुळे पैठणमधील पाचोडसह परिसरातील पिके पाण्याखाली
sakal

बोलून बातमी शोधा

 पाचोड (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : रात्री झालेल्या वादळी पावसामुळे कापसाच्या पिकांत पाणी साचले.

संततधार पावसामुळे पैठणमधील पाचोडसह परिसरातील पिके पाण्याखाली

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : पाचोडसह (ता.पैठण) (Paithan) परिसरात मंगळवारी (ता. ३१) पहाटे अचानक धो -धो पावसामूळे (Rain) बाजरी, मका व कापसाचे पिके आडवे होऊन या पिकासह मोसंबी व डाळिंबाच्या पिकांत पाणी साचल्याने तोंडाशी आलेला घास निसर्गाकडून हिरावला जातो की काय? या धास्तीने शेतकरी (Rain destroyed Crops) चिंताक्रांत बनला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. गत पंधरा वर्षांत मागील वर्षाचा अपवाद वगळता प्रथमतः सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहिले. पैठण तालुक्यातील शेतकरी गत पंधरा वर्षापासून दुष्काळी स्थितीने पूर्णतः नागवला गेला होता. त्यात अस्मानी संकटासह सुलतानी संकटाने आणखीन भर घातली. गत वर्षाचा अपवाद वगळता पंधरा-सोळा वर्षांनंतर यंदा मध्यरात्री परिसरातील (Aurangabad) नद्या दुथडी भरून वाहिल्या. येथील गल्हाटी नदी तुडूंब भरून वाहिली. गत वर्षी अतिवृष्टीमुळे खरिपाची पुर्णतः वाट लागली. तिच परिस्थिती यंदा अनुभवयास मिळत आहे. पंचवीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने खरीपाचा हगाम वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत असतानाच मध्यरात्री पावसाने जोमदार हजेरी लावली.

पाचोड (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : नद्या तुडूंब भरून वाहील्या.

पाचोड (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : नद्या तुडूंब भरून वाहील्या.

हेही वाचा: बीड जिल्ह्यात सांडव्यात मासे धरण्यासाठी गेलेला युवक वाहून गेला

बरड व हलक्या जमिनीवरील पिकांनी बाळसे धरले असून वाफसे होताच रानोमाळ पिकांस खते देण्याच्या कामासोबतच निंदणी, खुरपणी करण्याची लगीनघाई सुरु होईल. परंतू निसर्गाच्या लहरीपणामूळे तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाचोडसह लिबगाव, थेरगाव, दादेगाव, हर्षी, आडगाव, वडजी, सोनवाडी, खंडाळा, मुरमा, कोळीबोडखा, रांजनगाव दांडगा परिसरात अचानकच रात्री मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उभी पिके जमिनीवर आडवी झाली. सर्वत्र शेतकऱ्यांची धांदल उडाली. सकाळीच प्रत्येकाने शेतात फेरफटका मारून पिकांतील साचलेले पाणी काढण्यावर भर दिला. यासंबंधी प्रगतशील शेतकरी अशोक पा. निर्मळ, अंकुशराव जावळे म्हणाले, 'निसर्गाचा लहरीपणा शेती व्यवसाय कमकूवत करून शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटून टाकत आहे. पूर्वी दूष्काळाशी लढताना अन् आता दोन वर्षापासून अतिवृष्टी व गारपिट त्यात भर घालत आहे. अर्थातच मुसळधार पाऊस, गारपीट, वारे येणें दूष्काळात तेरावा महिनाच आहे, शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन जगण्याचे बळ देण्याची गरज आहे.

हेही वाचा: नांदेडला पुरात तिघे जण वाहून गेले,विष्णुपुरीचे तीन दरवाजे उघडले

पावसामुळे नद्या, नाले -ओढ्याना अचानक पूर येऊ शकतो. अशावेळी जनतेनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. पुरापासून स्वतःला, आपल्या गुरांना सुरक्षित ठेवावे. जनतेनी वाहत्या पाण्यात उतरू नये. तसेच जास्त पाणी वाहत असल्यास वाहत्या पाण्यातून वाहन घेऊन जाऊ नये अथवा स्वतः जाऊ नये. विजा कडाडत असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे, कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास स्थानिक तलाठी, पोलिस पाटील, कृषी सहायक, ग्रामसेवक, कोतवाल यांना तात्काळ माहिती द्यावी.

- चंद्रकांत शेळके, तहसिलदार, पैठण

loading image
go to top