औरंगाबाद : दूध संघातर्फे उत्पादकांना ७१ लाखांचा बोनस

दुध उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत जिल्हा दूध संघातर्फे दरवर्षी सकारात्मक निर्णय घेण्‍यात येतात.
milk.jpg
milk.jpgsakal
Updated on

औरंगाबाद : जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत जिल्हा दूध संघातर्फे दरवर्षी सकारात्मक निर्णय घेण्‍यात येतात. बुधवारी (ता.२३) ऑनलाईन झालेल्या बैठकीत संघातर्फे दुध उत्पादकांना ७१ लाख रुपयांचा बोनस जाहिर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी अध्यक्षतेखाली ऑनलाईन झाली.

milk.jpg
नागपूर-शिर्डी महामार्गावरील वाहतूक बंद, वैजापूरमधील नदीला पूर

उपाध्यक्ष नंदलाल काळे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, संघाचे संचालक राजेंद्र पाथ्रीकर, हिराबाई सोटम, सविता अधाने, के.एम. डि.के पाटील, गोकुळसिंग राजपूत, पुंडलिक काजे, राजेंद्र जैस्वाल, कुशिवर्ता बडक, प्रभाकर सुरडकर, शिलाबाई कोळगे, दिलीप निरपळ, व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप पाटील उपस्थित होते. आमदार बागडे म्हणाले की, कोरोनामुळे दूध संघाच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊन निव्वळ नफा कमी झाला.

तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता नुकतीच खरेदी दरात प्रती लिटर एक रुपयांची वाढ करण्यात आली. आता खरेदी दर हा २७ रुपये प्रती लिटर झाला आहे. तर दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीलिटर २५ पैसे प्रमाणे ७१ लाख २५ हजार रुपयांचा भावफरक वाटप करण्यात येईल. दरम्यान, डॉ. काळे यांनी दूध संकलन कमी असताना दुध भुकटी प्रकल्प उभारणीचा घाट का? पूर्वी ५ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या आता कर्ज झाले, असा आरोप केला.

त्यावर सिल्लोड येथे प्रकल्प, गांधेली येथे विस्तारीकरण असे सूमारे २० कोटींची कामे झाली आहेत, संघाला अधिक बळकट करण्यासाठी संघाने कसोशीने प्रयत्न केल्याचे आमदार बागडे यांनी सांगत आरोप राजकीय स्वरुपाचे असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sandu Tukaram Karhale Freedom Fighter Death
Chhatrapati Sambhajinagar
Yellow date farming success story in Marathwada earning Rs 3 lakh per acre
Who can apply for BAMU direct admission 2026?
Marathi News Esakal
www.esakal.com