
औरंगाबाद : शहर परिसरात जोरदार पाऊस
औरंगाबाद : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी शहर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. या पावसाची सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चिकलठाणा वेधशाळेत दिवसभराच्या (रात्री साडेआठ वाजेपर्यंत) २२.०३ मिलिमिटर एवढी नोंद झाली होती.
शहर परिसरात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा हजेरी लावली. दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडासह कधी रिमझिम तर कधी जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसाने शहरातील सखल भागात रस्त्यावर पाणी साचले होते. तसेच वातावरणात गारवा निर्माण झाला. झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडल्याची घटना शिवाजीनगर भागात घडली. कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरिकांची या पावसामुळे तारांबळ उडाली. चिकलठाणा वेधशाळेत या पावसाची २२.३ मिलिमिटर एवढी नोंद झाली. ५.३० ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत तीन तासात १८.५ मिलिमिटर पाऊस झाला.
Web Title: Aurangabad Monsoon Heavy Rains In City Area Weather Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..