

Sambhajinagar Hospital News
esakal
सुनील इंगळे
छत्रपती संभाजीनगर: शहरातील जालना रोडवरील दूध डेअरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या ४०० खाटांच्या अत्याधुनिक महिला व नवजात शिशू रुग्णालयाची आठ मजली इमारत आता पूर्णत्वाकडे आहे. मात्र, इमारतीमध्ये लिफ्ट, इलेक्ट्रिकल, पॉवर हाउससह इतर कामांसाठी जवळपास ७८ कोटींचा वाढीव निधी लागणार आहे.
गेल्या वर्षभरापासून प्रशासनाच्यावतीने पाठपुरावा करूनही निधी मिळत नसल्यामुळे काम खोळंबले आहे. वाढीव निधीमुळे इमारतीचा खर्च १११ कोटी रुपयांवरून १८९ कोटी रपयांपर्यंत पोचला आहे.