Aurangabad : मागासवर्गीयांच्या आंदोलनामुळे बदलली भाजप संघाची भाषा

चंद्रशेखर आजाद : नव्या षड्‍यंत्राची शक्यता
BJP news
BJP newsesakal

औरंगाबाद : मागासवर्गीय घटक त्यांच्या मागण्यांसाठी करीत असलेल्या आंदोलनाची भीती भारतीय जनता पक्षाला आहे. याच आंदोलनांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा आता बदलली आहे. तथापि, यातही नवे षड्‍यंत्र आखले जात असल्याचा आरोप भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी शुक्रवारी (ता.१४) औरंगाबादेत पत्रकार परिषदेत केला.

BJP news
Aurangabad : लोकशाही नव्हे,देशात हुुकूमशाही

एका कार्यक्रमासाठी चंद्रशेखर आजाद हे औरंगाबादेत आले होते. आजाद म्हणाले, की संघाचे मुख्यालय नागपूरला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोहन भागवत हे बदललेले असून त्यांचे वक्तव्य बदलत आहे. त्यांच्या बोलण्यातून परिवर्तन दिसत आहे. त्यांना पहिल्यांदाच आपल्या चुकांची जाणीव झाल्यासारखे वाटते. जे आजपर्यंत भेदभाव करत होते तेच आज समानतेबाबत बोलत आहेत. यातून काहीतरी नवीन षड्‍यंत्र सुरू असल्याची शक्यताही आजाद यांनी व्यक्त केली.

BJP news
Aurangabad : माध्यमांत दलित-आदिवासींचा टक्का नगण्य

पाच वर्षांत आम्ही जो संघर्ष केला, त्यानंतर अल्पसंख्याक आणि ओबीसी आपल्या हक्कांसाठी लढाई लढत आहेत. आंदोलने करत आहेत. त्यामुळे भाजप बिथरलेला आहे. आज जे गोड-गोड बोलले जाते, मला असं वाटतं की बकऱ्याची कुर्बानी देण्याच्या आधी जसं करतात तशी परिस्थिती आहे. तसे संकेत असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहेत. हे फक्त बोलतात, यांच्याकडे सरकार आहे, तर यांनी जातीय व्यवस्था संपवून टाकायला पाहिजे. यांना कुणी थांबवलं? असा सवालही चंद्रशेखर आझाद यांनी केला.

BJP news
Aurangabad : औरंगाबादेतील आनंद हास्य क्लब देतोय चिंतामुक्त होण्याची शिकवण

औरंगाबादेत सर्वाधिक कर

औरंगाबादेत आल्यानंतर मला रस्त्यावर जास्त पाणी दिसले. मात्र, शहरवासीयांच्या घरातच पाणी नाही. मुंबई-पुण्याला नाहीत त्याहून जास्तीचा कर औरंगाबादकरांना द्यावा लागत आहे. त्या तुलनेत पाणी दिले जात नाही. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घेतले. त्याचप्रमाणे भीमा-कोरेगाव आणि खैरलांजी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. सरकार सध्या आमदार पळविण्यात आणि आमदार जोडण्यात गुंतून आहे. या सरकारने त्यांच्या पक्षापेक्षा जनतेच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे, ते महत्त्वाचे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com