esakal | म्यूकरमायकोसिसने तिघांचा मृत्यू, २४८ रुग्णांवर उपचार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

म्यूकरमायकोसिसने तिघांचा मृत्यू, २४८ रुग्णांवर उपचार सुरु

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : कोरोना Corona पाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या Mucormycosis आजाराची सुरूवात झाली. रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी होत नाही. रविवारी (ता.११) तिघांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा मृतांचा आकडा १४८ झाला आहे. २४८ रुग्णांवर उपचार सुरू असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५० इतकी आहे. कोरोनानंतर म्यूकरमायकोसिस म्हणजे बुरशीजन्य संसर्गाचे नवे संकट उभे राहिले आहे. कोरोनातून बरे झालेल्या किती तरी रुग्णांना हा संसर्ग होत आहे. त्यामुळे केवळ शहरातीलच नव्हे, तर मराठवाड्यातील Marathwada आणि बाहेरील काही जिल्ह्यांतूनही शहरात Aurangabad अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या आजाराचे गांभीर्य विचारात घेऊन आता महापालिकेकडून सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांतील रुग्णांची माहिती नियमितपणे संकलित केली जात आहे.aurangabad mucormycosis updates three patients died

हेही वाचा: वैजापूर तालुक्यात अपघात, दोघा तरुणांचा मृत्यू

त्यानुसार आतापर्यंत शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये म्यूकरमायकोसिसच्या ११५९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १५० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असले तरी २४८ रुग्ण दाखल असून त्यांच्या उपचार केले जात आहेत. महापालिकेकडून प्राप्त अहवालानुसार रविवारी म्युकरमायकोसिसच्या आजाराने तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोघांचा घाटी रुग्णालयात तर एकाचा बजाज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने एक रुग्ण दाखल झाला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ११५९ वर पोचली तर आजारातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ८६१ इतकी आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये एमआयटी रुग्णालयात सर्वाधिक ३० रुग्ण उपचार घेत आहे. त्यापाठोपाठ घाटी रुग्णालयात २७, डॉ. हेडगेवार रुग्णालय २५, एमजीएम २५, जिल्हा रुग्णालय ११ रुग्ण उपचार घेत आहेत.

loading image