esakal | औरंगाबाद पालिकेने सुरू केलेल्या 'प्रगती' पेट्रोल पंपाला प्रतिदन ७ लाखांचे उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

पालिकेच्या 'प्रगती' पेट्रोल पंपाला प्रतिदन ७ लाखांचे उत्पन्न

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पालिकेचा महसूल वाढवण्यासाठी शहरात पालिकेच्या मालकीचे पेट्रोल पंप सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये शहरात पाच पेट्रोल पंप सूरू करण्याची योजना आहे. त्यातील पहिला पेट्रोल पंप २८ जून रोजी मध्यवर्ती जकात नाक्याजवळ सूरु करण्यात आला होता. या पेट्रोल पंपाचे नाव प्रगती पेट्रोल पंप असे ठेवण्यात आले होते. याचा फायदा आता पालिकेला होत असल्याचे दिसत आहे. नागरिकांचाही या पंपाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रगती पेट्रोल पंपाने अवघ्या ९ दिवसांत ६३ लाखांचे उत्तन्न कमविले आहे, म्हणजे प्रतिदिन पंपाला सात लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

प्रगती पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्हींची विक्री केली जात आहे. शहरातील नागरिकांकडून या पंपाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या पेट्रोल पंपामध्ये महापालिकेच्या वाहनांना कंपनीच्या दरानुसार तर सर्वसामान्य वाहनांना व्यावसायिक दराने इंधन विक्री केली जात आहे. तर प्रतिदिन पालिकेला सात लाखांचे उत्त्पन्न मिळत असल्याचे पालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून सांगण्यात आले आहे. पालिकेची वाहने याच पंपातून इंधन भरत असल्याने पालिकेचे लाखो रुपये वाचले आहेत.

हेही वाचा: औरंगाबादेत चिकनच्या दराने केले 'रेकॉर्ड ब्रेक'

औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्याच पेट्रोल पंपाला मिळत असणारा हा प्रतिसाद पाहता पालिकेला चांगलेच हुरुप आले आहे. पुढील चार पेट्रोल पंपही सुरू होण्यास या प्रतिसादाने वेग येणार आहे. सध्या प्रगती पेट्रोल पंपावर पालिकेची प्रशासकीय वाहने इंधन भरत आहेत. भविष्यात कचरा संकलनासाठी आणि वाहतुकीसाठी नियुक्त केलेली रेड्डी कंपनीची वाहने या पंपाकडे वळविण्याचा विचार आहे. तसेच शहरातील सिटी बसेसही इथं इंधन भरावे यासाठी पालिका विचारात आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे.

loading image