esakal | औरंगाबादेत चिकनच्या दराने केले 'रेकॉर्ड ब्रेक'
sakal

बोलून बातमी शोधा

chicken

औरंगाबादेत चिकनच्या दराने केले 'रेकॉर्ड ब्रेक'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मागील वर्षी कोरोनामुळे पोल्ट्री चालकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यानंतर चिकन, अंडी बद्दलच्या अफवा फोल ठरल्याने पुन्हा एकदा चिकनचे दर पुर्ववत झाले होते. मात्र मागील महिनाभरापासून पोल्ट्रीसाठी लागणाऱ्या खाद्यांचे दर अतिशय जास्त झाल्याने चिकन दर विक्रमी २४० रुपये प्रती किलो झाला आहे. या अगोदर चिकनला १६० ते १८० रुपये प्रती किलो दर होता.

मागील काही दिवसात पोल्ट्री चालकांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोंबड्यांसाठी लागणाऱ्या खाद्यांचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना कोंबडी पालन करणे अवघड झाले आहे. पुर्वी ३५०० रुपयांना मिळणारे खाद्य आता ८ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत गेले आहे. त्यामुळे पोल्ट्री चालकांचा खर्च वाढला आहे. पुर्वी पोल्ट्री चालकांकडून जिंवत कोंबडी ९० ते १०० रुपये प्रती किलो मिळत होती तीच कोंबडी आज १६० रुपये प्रती किलोच्या पुढे गेली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना चिकनचे दर वाढविले आहे.

हेही वाचा: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची हिंगोलीत सायकल रॅली

सध्या अनेक पोल्ट्री चालकांना महागडे खाद्य घेऊन पोल्ट्री चालविणे अवघड झाल्याने त्यांनी उत्पादनात थोडा ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सध्या चिकनसाठी तुटवडा असल्याने ही दर वाढले आहे. पोल्ट्री चालकांकडे मालच मिळत नाही मिळाला तर तो खूप महागडा आहे त्यामुळे किरकोळ मध्ये तो २४० रुपये प्रती किलो दराने विक्री करावा लागत असल्याचे मध्यवर्ती जकात नाका येथील विक्रेते बाबुभाई यांनी सांगितले.

loading image