कुंभारवाडा तुळशीबाग तर रंगारगल्ली हिंगलाजनगर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Municipal Corporation change 46 names of colonies

कुंभारवाडा तुळशीबाग तर रंगारगल्ली हिंगलाजनगर!

औरंगाबाद : वर्षानुवर्षापासून कुंभारवाडा म्हणून ओळख असलेल्या या जुन्या शहरातील भागाचे आता तुळशीबाग असे नामकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर रंगारगल्लीचे नाव हिंगलाज नगर, जोहरीवाड्याचे पारस नगर तर भोईवाडाचे गंगापूत्र कॉलनी, असे नाव ठेवण्यात आले आहे. महापालिकेने ४६ वसाहतींचे नावे बदलली आहेत.

राज्य सरकारने जातिवाचक नावे असलेले गावे, शहरे व वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने शहरातील ५४ वसाहतींचे नावे बदलण्याचा ठराव मंजूर केला आहे. प्रशासनाने वॉर्ड कार्यालयांकडून जातिवाचक वसाहतींच्या नावांची यादी मागवली होती. या यादीनुसार नावे बदलण्यात आले आहेत. अशा वसाहतींचे नावे बदलून काय ठेवायचे? यासाठी नागरिकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या नाववरही आक्षेप नोंदविण्यात आले. आक्षेपांची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर ५४ नावांपैकी ४६ वसाहतींची नावे बदलण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

बदललेली नावे

कुंभार गल्ली-गोरोबा काका गल्ली, ब्राम्हण गल्ली-जगदंब गल्ली, मल्लावपूरा-सावता गल्ली, भिल्ल गल्ली भिमनगर-एकलव्य नगर, मांगवाडा-मुक्ताई नगर, चांभारवाडा-संत रोहीदास गल्ली, भंगीवाडा-वाल्मिकी नगर, बौद्धवाडा-सारनाथ गल्ली, मोमीनपूरा-सुलतानपूरा, धोबीघाट-संत गाडगेबाबा धोबीघाट, तेलंगवाडा-बिरसा मुंडा मोहल्ला, गवळीपूरा-विकासपूर, कुंभारवाडा-तुळशीबाग, जोहरीवाडा-पारसनगर, रंगार गल्ली-हिंगलाजनगर, माळीवाडा-सावतानगर, भोईवाडा-गंगापूत्र कॉलनी, पारधीपूरा-जीवक नगर, बौद्धवाडा (पैठणगेट)-किरण नगर, कैकाडीवाडा-शास्वतनगर, भोईवाडा-उदय कॉलनी, गोंधळीवाडा-जगदंबा नगर, धनगरगल्ली-होळकरनगर, कैकाडी गल्ली-जाधववाडा, चांभारगल्ली-एकतानगर, ब्राम्हणगल्ली-उन्नतीनगर, मांगवाडा-लहुजीनगर, सोनारगल्ली-प्रेरणानगर, धनगरवाडा-अहिल्याबाई होळकर नगर, साठेनगर-आण्णाभाऊ साठे नगर, बौद्धवाडा-गौतम बौद्ध नगर, सुतारवाडा-आयोध्यानगर, माळी गल्ली-महात्मा फुलेनगर, कुंभारवाडा-संत गोरोबानगर, तेलीगल्ली-अमृतनगर, ब्राम्हणगल्ली-परशुराम नगर, चांभारवाडा-संत रोहीदास नगर, कुरेशी मोहल्ला-सय्यद सादात मोहल्ला, वैदुवाडा-जयदुर्गानगर, मोची मोहल्ला-बाबा रामदेवनगर.

Web Title: Aurangabad Municipal Corporation Change 46 Names Of Colonies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top