Aurangabad : रुग्णसंख्या वाढण्याच्या भीतीमुळे चाचण्यांकडे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swine Flu In Aurangabad

Aurangabad : रुग्णसंख्या वाढण्याच्या भीतीमुळे चाचण्यांकडे दुर्लक्ष

औरंगाबाद : कोरोना पाठोपाठ आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांची भीती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असताना महापालिकेने स्वाइन फ्लूसंदर्भात चाचण्या घेतल्याच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, स्वाइन फ्लू व कोरोना संसर्गाची लक्षणे सारखीच आहेत. याविषयी विचारणा करताच आता शनिवारपासून चाचण्या घेतल्या जातील, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

कोरोना पाठोपाठ राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार राज्य शासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्क केले आहे. असे असले तरी महापालिकेला अद्याप स्वाइन फ्लूचे गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेने कोरोना संसर्गासंदर्भात दहा ठिकाणी चाचणी केंद्र सुरू केले आहेत. याठिकाणी स्वॅबचे नमुने घेऊन त्याची घाटी रुग्णालयाच्या प्रयोग शाळेत तपासणी केली जाते. त्यामुळे कोरोनाच्या स्वॅब सोबतच स्वाइन फ्लूचा स्वॅब घेणे अपेक्षित होते. पण, महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढण्याची भीती वाटत असल्याने आत्तापर्यंत स्वाइन फ्लूचे स्वॅब घेण्याची तसदी घेतलेली नाही. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून यासंदर्भातील फॉर्म भरून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याची कबुली आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

गोळ्यांचा संपला साठा

महापालिकेकडील काही गोळ्यांचा साठा संपलेला आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांना टॉमी फ्लू या गोळ्या दिल्या जातात. पण, या गोळ्यांचा संपल्यामुळे तातडीने दोन हजार टॉमी फ्लू गोळ्यांची मागणी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे केली आहे. टॉमी फ्लू गोळ्या उपलब्ध करून घ्याव्यात, अशी सूचना आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केली.

रुग्णसंख्या वाढण्याच्या भीतीमुळे चाचण्यांकडे दुर्लक्ष

डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. कोरोना टेस्टिंग सेंटरवर स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी फॉर्म भरून घेण्यात यावेत, असे आदेश डॉ. मंडलेचा यांनी आता वैद्यकीय विभागाला दिले आहेत.

एका दिवसात महिलेचा मृत्यू

ऑगस्ट महिन्यात शहरात ३४ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. अशा रुग्णांचा खासगी लॅबमध्ये स्वॅब घेऊन तपासणीसाठी घाटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठवला जातो. प्रयोग शाळेतून पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतरच त्या रुग्णाची माहिती महापालिकेला कळविली जाते. दरम्यान, खासगी रुग्णालयात २८ ऑगस्टला दाखल झालेल्या ५१ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या महिलेचा २९ ऑगस्टला मृत्यू झाला असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.