esakal | औरंगाबाद महापालिकेची धडक कारवाई, दीडशेहून अधिक अतिक्रमणे हटवले
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबादेत महापालिकेने दीडशेहून अधिक अतिक्रमणे हटवले आहेत.

औरंगाबाद महापालिकेची धडक कारवाई, दीडशेहून अधिक अतिक्रमणे हटवले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिकेच्या Aurangabad Municipal Corporation अतिक्रमण विभागातर्फे गजानन महाराज मंदिर परिसर, एसएफएस यासह सिडको बसस्थानक परिसरातील दोन्ही बाजूंनी असलेल्या अतिक्रमणे सोमवारी (ता.१२) हटवण्यात आली. यात १५० हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या प्रमुख पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार यांनी दिली. महापालिकेतर्फे सातत्याने शहरातील Aurangabad सर्व भागातील अतिक्रमणे काढण्यात येत आहे. सविता सोनवणे म्हणाल्या की, महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय IAS Astik Kumar Pandey, अतिरिक्त आयुक्त श्री.निकम यांच्या निर्देशानुसार ही अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. aurangabad municipal corporation removed above 150 illegal encroachments

हेही वाचा: Nanded Rain Updates : अर्धापुरात अतिवृष्टी, शेती गेली खरडून

सकाळपासून १५० ते १६० अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. यासह काही टपऱ्या व हातगाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. आज दिवसभर ही कारवाई सुरू राहणार आहे. त्यात सिडकोतील ग्रीन बेल्टमधील सर्व अतिक्रमणे आम्ही काढणार आहोत. यासाठी जेसीबी यंत्रासह संपूर्ण टीम सोबत आहे, असेही सोनवणे यांनी सांगितले. श्री.राचतवाल, महापालिकेचे मजहर अली, पोलिस कर्मचारी पी.बी.गवळी, पोलिस निरीक्षक सय्यद अफजल, मोहिनुद्दीन शेख, श्री.सुरासे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी डी.एन.ओव्हाळ, बी.एल.गायकवाड यांची पथकाने ही कारवाई केली आहे.

loading image