esakal | Nanded Rain Updates : अर्धापुरात अतिवृष्टी, शेती गेली खरडून
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Rain Updates : अर्धापुरात अतिवृष्टी, शेती गेली खरडून

Nanded Rain Updates : अर्धापुरात अतिवृष्टी, शेती गेली खरडून

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : अर्धापूरसह Ardhapur तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने दाणादाण उडाली आहे. तालुक्यातील कामठा,मालेगाव, पार्डी या गावांतील सखल वस्तीमधील घरात पाणी शिरले. काही गावांमधील शेती खरडून गेले असून पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासामध्ये १२२ मिलिमीटर पावसाची Rain नोंद झाली आहे. पहिलाच मोठा पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. काही भागात पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये Farmer समाधानाचे वातावरण आहे. सखल भागात असलेल्या Nanded वस्तीमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.heavy rain hit ardhapur of nanded district, crops damaged

हेही वाचा: परभणीत पावसाचा कहर! पुरात अडकलेल्या बारा जणांची सुटका

यंदाच्या खरिपाच्या पेरण्या जूनमध्येच आटोपल्या. मात्र गेल्या पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातारण निर्माण झाले होते. या आठवड्यात पावसाने दरमदार हजेरी लावली. अर्धापुरातील दुर्गानगर, अंबाजीनगर, बसवेश्वर चौक, सखारामजी लंगडेनगर आदी भागाला तळल्याचे स्वरूप, तर बसवेश्वर चौक ते बायपास रस्त्यावर दोन फुटांच्यावर पाणी जमा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. हा पाऊस सर्वत्र बरसला. कामठा, मालेगाव या गावातील वस्तीमध्ये पाणी शिरले. दुसरीकडे कामठ्यातील बसवेश्वर शाळेकडे जाणारा रस्ता खरडून गेला. तसेच दाभड, शैलगाव, लहान पार्डी  येथेही अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीची तालुका प्रशासन माहिती घेत आहे.

loading image