
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या इंदिरानगर बायजीपुरा शाळेतील विद्यार्थिनी अंजली गायकवाड हिने शाळेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (ता. १७) दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसोबत संवाद साधला. यावेळी तिने महापालिकेच्या रोबोटिक्स प्रकल्पाचे सादरीकरण केले.