औरंगाबाद शहरात अडीच हजार किलोमीटरचे रस्ते! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Municipal Smart City roads construction

औरंगाबाद शहरात अडीच हजार किलोमीटरचे रस्ते!

औरंगाबाद - महापालिका स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात जीआयएस प्रणालीव्दारे सर्वेक्षण करत आहे. त्यात शहरातील प्रत्येक बारकावे टीपले जात आहेत. दोन लाख ३८ हजार ५१० झाडे शहरात असल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर इतर बाबी देखील समोर येत आहेत. तब्बल अडीच हजार किलोमीटर लांबीचे रस्ते शहरात असल्याची नोंद घेण्यात आली आहे. जीआयएस सर्वेक्षणाअंतर्गत शहरातील ३०० बाबींची नोंद घेतली जात आहे.

सर्वेक्षणाचे पहिल्या वर्षीचे काम प्रगतिपथावर असून, त्यातून समोर आलेल्या बाबींची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना दिली जात आहे. या संदर्भात उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, अ‍ॅमनेक्स कंपनीव्दारे हे काम केले जात आहे. ड्रोनच्या साह्याने शहराच्या इमेजेस घेऊन त्याची पडताळणी केली जात आहे. त्यात शहरात दोन हजार ५५५ किलोमीटरच्या रस्ते तयार झाले आहेत. डांबरीकरणाचे ५८१ किलोमीटरचे रस्ते असून, १ हजार ८४ किलोमीटरचे सिमेंटचे रस्ते बनविण्यात आले आहेत. खडीकरणाचे ६१ किलोमीटरचे तर ८२८ किलोमीटरचे कच्चे आहेत, असे श्रीमती थेटे यांनी सांगितले.