
औरंगाबाद : तो लष्करी सेवेत. आधीचा विवाहित, मात्र रुग्णालयात आजीला उपचारासाठी आणल्यानंतर ‘तिच्या’शी ओळख झाली. यानंतर त्याने तिच्याशी ‘तुला कायम सांभाळ करीन’ असे म्हणत शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, एक दिवस पत्नीसोबत वाद झाल्यानंतर जवानाने चक्क ‘हि’च्या ११ वर्षीय मुलाला प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने वायरने मारहाण केली. महिनाभरानंतर चिमुकल्याचा उपचारादरम्यान जीव गेल्यानंतर ‘ती’ने पोलिसात धाव घेत फिर्याद दिल्याने लष्करी सेवेतील ‘त्या’ च्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बबन थोरात (३०, रा. माणिक चौक, वार्ड १६, सिंदखेडराजा, जि बुलढाणा) असे त्या जवानाचे नाव असून पोलिसांनी त्याला रविवारी (ता.२८) पहाटे बेड्या ठोकल्या. याप्रकरणी गजानननगरातील २९ वर्षीय विवाहितेने फिर्यादी दिली. त्यात नमुद केले की, तिची आणि आरोपीची एका खासगी रुग्णालयात ओळख झाली. फिर्यादीच्या पतीला मूत्रपिंडाचा आजार असल्याने तो दोन वर्षांपासून इंदोर येथे त्याच्या आई-वडिलांकडे राहतो. तर फिर्यादी ही ११ वर्षीय मुलासोबत औरंगाबादेत राहत होती. दोन-अडीच वर्षांपूर्वी फिर्यादीच्या पतीला किडनीच्या आजाराने एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल केले.
त्यावेळी आरोपी गणेश थोरात आणि फिर्यादीची ओळख झाली. तेव्हा आरोपीची पत्नी जवळची नातेवाईक असल्याचे फिर्यादीला समजले. फिर्यादीचा पती इंदोरला गेल्यानंतर आरोपीने त्याचा फायदा घेत माझी बायको मला आवडत नाही, असे म्हणत फिर्यादीशी प्रेमसंबंध निर्माण केले. व मी फौजमध्ये आहे. तुला काहीच कमी पडू देणार नाही असे म्हणत प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
आरोपी हा छावणीत कर्तव्यावर असताना तो फिर्यादीच्या घरी राहू लागला. तिला पत्नीसारखा वागवू लागला, तिच्याशी शारीरिक संबंध देखील ठेवत होता. आरोपीने फिर्यादीला दिवाळी सणाच्या दिवशी फिर्यादीच्या गळ्यात माळ टाकून तिच्या केसात आणि कपाळाला कुंकु लावून आजपासून तू माझी बायको असे म्हणाला. जानेवारी २०२२ मध्ये आरोपीची कुपवाडा (जम्मू काश्मीर) येथे तर जून २०२२ मध्ये गुरुदासपूर (पंजाब) येथे बदली झाली. मात्र, आरोपी व फिर्यादी हे मोबाईलवरून संपर्कात होते.
दरम्यान, २६ जून २०२२ रोजी फिर्यादी आणि आरोपी ट्रॅव्हल्सने औरंगाबादेत आले. आरोपीने फिर्यादीला घरी सोडले व तो सिंधखेड राजा येथे निघून गेला. यानंतर ३० जून रोजी फिर्यादी व तिचा मुलगा घरात असताना दुपारी साडेबारा वाजता आरोपी तेथे आला. त्याने मला पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करतो का म्हणत वायरने मुलाला बेदम मारहाण केली. मुलाचा आवाज ऐकताच फिर्यादी बेडरुम बाहेर आली असता, मुलगा गंभीर अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. दोघांनी त्याला एमजीएममध्ये दाखल केले. तत्पूर्वी आरोपीने माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. त्यामुळे मुलाला तूच मारले असे सांग अशी विनवणी केली. उपचार सुरु असताना आरोपीने बायोकोसोबत भांडण झाले होते. तिला मारहाण केल्याने तिचा हात मोडला. त्यामुळे टेन्शनमध्ये होतो. त्याच टेन्शमुळे मुलाला केबलने मारहाण केल्याचे फिर्यादीला सांगितले. मात्र, उपचार सुरु असतांना २७ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मुलाचा मृत्यू झाला.
प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला रविवारी (ता.२८) न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी आरोपीने गुन्ह्यात वापरलेला केबल वायर, परिधान केलेले कपडे हस्तगत करायचे आहे, यासाठी पोिलस कोठडीची मागणी केली होती.
१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत
मुलाला मारहाण करण्याचा आरोपीचा नेमका उद्देश काय होता, आरोपी हा सैन्य दलातकार्यरत असून तो औरंगाबादेत कधी-कधी आला होता व तो कायदेशीर रजेवर होता किंवा कसे याचा तपास करायचा आहे. आरोपीने फिर्यादीला कोठे फिरण्यासाठी नेले होते याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली असता आरोपीला १ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.व्ही. सपाटे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.