
"जब कुर्सी लडखडाने लगी तब..."; इम्तियाज जलील यांचा ठाकरेंना टोला
औरंगाबाद : "तीस वर्षापूर्वी बाळासाहेबांनी औरंगाबाद शहराचं नाव बदलण्याची घोषणा केली होती. हा निर्णय संभाजी महाराजांच्या सन्मानासाठी घेतला नसून जेव्हा आपल्या खुर्चीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले तेव्हा हा निर्णय घेण्यात आला आहे. जेव्हा सरकार पडेल असं वाटलं तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला आहे." असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे यांना लागावला आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधातील मोर्चाच्या वेळी ते बोलत होते. (Imtiyaj Jaleel Speech)
ठाकरे सरकारने शेवटच्या क्षणाला औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेमापोटी हा निर्णय घेण्यात आलेला नाही असं जलील आपल्या भाषणात म्हणाले आहेत. जर तुम्हाला शहराविषयी एवढंच प्रेम असेल तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवा, इथले बेरोजगारीचे प्रश्न सोडवा आणि मग नामांतर करा असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचा: "जलील राष्ट्रपती किंवा पंतप्रधान नाहीत, त्यांच्या मोर्चाला आम्ही महत्त्व देत नाही"
तीस वर्षे ज्या विचारांनी आपले दुकान चालत होते त्याविषयीच त्यांनी आता शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला आहे. तुम्हाला नामांतराचा निर्णय घ्यायचाच होता तर त्यावेळीच घ्यायचा होता पण आता तुमची खुर्ची टिकण्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा देश चालेल तर आंबेडकरांच्या संविधानावर चालेल असं वक्तव्य जलील यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय मुंबईत बसून घेतला आहे आणि त्यांचा हा निर्णय आम्ही कसा स्विकार करायचा? महाविकास आघाडी सरकारचे सगळे सूत्र शरद पवारांच्या हाती होते पण शरद पवार आता खोटं बोलत आहेत असा आरोप जलील यांनी यावेळी केला आहे.
Web Title: Aurangabad Name Change Mp Imtiyaj Jaleel Speech
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..