
औरंगाबाद : राष्ट्रीय लोकअदालतीत मिटली तब्बल ५१ कोटींची प्रकरणे
औरंगाबाद : जिल्हा न्यायालयात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १,१६५ प्रलंबित व ६०९ दाखलपूर्व असे एकूण १ हजार ७७४ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रलंबित प्रकरणांमध्ये ४८ कोटी ५४ लाख ६२ हजार ८९६ व वादपूर्व प्रकरणांमध्ये एकूण ०२ कोटी ५५ लाख ६७ हजार १११ रुपये इतकी वसुली झाली. एकूण ५१ कोटी १० लाख ३० हजार ७ रुपयांएवढ्या रक्कमेचा समोवश असलेली प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीने मिटली. या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. कलोती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
लोक अदालतमध्ये मोटार अपघात, विज चोरी, धनादेश अनादर, भूसंपादन व तडजोडयुक्त दिवाणी, फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच वादपूर्व प्रकरणात आसीआयसीआय बँक, गोदावरी अॅग्रोटेक प्रा.लि. भारत संचार निगम लि. व्होडाफोन-आयडीया, जॉन डीअर फायनान्स, महापारेषण आणि ट्रॅफिक ई-चालनाची आणि मध्यस्थी केंद्रामधील वादपूर्व प्रकरणे, बजाज फायनान्स, उज्जीवन स्मॉल फायनान्स, फुलर्टन इंडिया केडीट, एचडीएफसी बँक, श्रीराम सिटी आरबीएल बँक, टीव्हीएस केडीट (सर्व शाखा), युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक आफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआय कार्ड रिपेमेंट प्रा.लि, कॅनरा बँक, युको बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब व सिंध बँक (सर्व शाखा) यांची वादपूर्व प्रकरणे (सर्व शाखा) मध्यस्थी केंद्रामधील वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली.
लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. कलोती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश एस. एस. भिष्मा, टी. जी. मीटकरी, एस.के. कुलकर्णी, एस.एस. देशपांडे, एम.एस. देशपांडे, ए.ए. कुलकर्णी, पी.आर. शिंदे, दिवाणी न्यायाधीश एस.डी. कुर्हेकर, मुख्य न्यायदंडाधिकारी तथा प्रभारी सचिव जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण जयेश आंबोडकर यांनी बैठका घेतल्या. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. संतोष प्राथीकर, सचिव अशोक मुळे इतर पदाधिकारी आणि वकील संघाच्या सभासदांनी सहभाग नोंदवला.
Web Title: Aurangabad National People Court Settled 51 Crore Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..