esakal | पैठणसह परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; फळबागांसह उन्हाळी बाजरीचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

rain adul

पैठणसह परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; फळबागांसह उन्हाळी बाजरीचे नुकसान

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

आडुळ (औरंगाबाद): पैठणसह परिसरात बुधवारी (ता.१४) रोजी दुपार नंतर अचानक वातावरणात बदल होऊन विजेच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. तर एकतुनी, दाभरुळ व अंतरवाली खांडी येथे गारा पडल्याने फळबागांसह उन्हाळी बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसात वाऱ्याचा जोर जास्त असल्याने शेतात राहणारे शेतकरयांच्या घराचे व जनावरांसाठी असलेल्या गोठ्यावरील पत्रे उडाले आहेत.

शेतकऱ्यांनी जनावरांसाठी ठेवलेला चाराही भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा जरी निर्माण झाला असला तरी जोरदार वारा व गारा पडल्याने शेतकऱ्यांची मात्र मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळाले. आडूळ, एकतुनी, कडेठाण, देवगाव, अंतरवाली खांडी, रजापुर, देवगाव, सुलतानपूर, बालानगर, कचनेर फाट्यासह परिसरातील गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले

रोजेदार बांधवांना पावसाने दिलासा-

आज पासून मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला. त्यामुळे अनेक समाज बांधवांनी आज पहिला रोजा (उपवास) ठेवला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दुपारपर्यंत रोजा ठेवलेल्यांची उन आणि गर्दीमुळे जिवाची लाहीलाही होत होती. मात्र दुपारनंतर अचानक मेघगर्जनेसह अभाळ भरुन आले व नंतर कुठे मध्यम तर कुठे जोरदार अवकाळी पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे रोजा ठेवणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.