
नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरोधात धडक कारवाई
औरंगाबाद : मकरसंक्रातीचा सण (Makar Sankrati festival)जवळ येताच पोलिसांनी नायलॉन मांजा(nylon manja) विक्रेत्यांवर कारवाई सुरु केली आहे. गुलमंडीवर महिलेचा गळा कापल्या गेल्यानंतर पोलिसांनी मांजा विक्रेत्यांविरुध्द मोहिम सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मांजा विक्रेत्यांविरुध्द सलग कारवाई होत आहे. शुक्रवारी पोलिसांनी कारवाई करत पाच मांजा विक्रेत्यांना पकडले. त्यांच्याकडून साडेचार हजारांचा मांजा जप्त करण्यात आला.
हेही वाचा: कोरोनामुळे चित्रीकरणावर परिणाम
शहरात एक महिला नायलॉन मांजा गळ्याला अडकल्याने दुचाकीवरून पडून जखमी झाल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत स्युमोटो याचिका दाखल करुन घेतलेली आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत नायलॉन मांजाची सर्व माहिती बुधवारी (ता. बारा) सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्याच अनुषंगाने पोलिस प्रशासनाने मांजा विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरु केले आहे.
हेही वाचा: म्हसरूळची रुही देशमुख अमेरिकेत बनली संशोधक
पोलिसांनी कोकणवाडीतील सुनील काळे यांच्या दुकानातून सहाशे रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. उस्मानपुरा, मिलींदनगरातील खिल्लारे जनरल स्टोअर्सवर छापा मारुन उमेश निवृत्ती खिल्लारे यांच्या ताब्यातून मांजा जप्त केला. याशिवाय सिडको, एन-७ मधील मोकळ्या मैदानात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या अमोल राजेंद्र पाराशेर (रा. अयोध्यानगर) याच्याकडून एक हजार ४०० रूपयांचा मांजा जप्त केला. तर सिडको, एन-११ भागातील शुभम पतंग सेंटरचे अर्जुन कुंडलीक फलटणकर (रा. सुदर्शननगर, एन-११) यांच्या ताब्यातून १ हजार १०० रूपयांचा नायलॉन मांजा हस्तगत केला आहे. तसेच कपिलसिंग अमरसिंग राजपुत (रा. बुढीलेन, महादेव मंदिराजवळ) याच्या दुकानातून दोन हजारांचा मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
Web Title: Aurangabad Nylon Manja Sellers Dhadak Action Against
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..