म्हसरूळची रुही देशमुख अमेरिकेत बनली संशोधक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mhasrul nashiks Ruhi Deshmukh in America Became a researcher
म्हसरूळची रुही देशमुख अमेरिकेत बनली संशोधक

म्हसरूळची रुही देशमुख अमेरिकेत बनली संशोधक

म्हसरूळ : येथील रहिवासी रुही देशमुख या विद्यार्थिनीची अमेरिकेतील आघाडीच्या इंटेलीया कंपनीमध्ये सिनिअर रिसर्च असोसिएट’ म्हणून निवड झाली असून, ‘इम्युनॉलॉजी’ या विषयावर ती संशोधन करणार आहे. विशेष म्हणजे जगातील मोजक्याच विद्यार्थ्यांची ज्या ठिकाणी निवड केली जाते, त्या ठिकाणी नाशिकमधील म्हसरूळच्या विद्यार्थिनीची निवड झाल्यामुळे तिचे व देशमुख कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रुहीच्या निवडीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे चित्रीकरणावर परिणाम

दिंडोरी रोडवरील परीक्षित हॅास्पिटलचे संचालक डॉ. सतीश देशमुख यांची रुही ही कन्या आहे. तिचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील रासबिहारी हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण एचपीटी महाविद्यालयात झाले आहे. पुढील शिक्षण मुंबईतील जयहिंद कॅालेजला झाले. त्यापुढील एम. एस. बायोटेक्नॅालॅाजीचे शिक्षण तिने अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात पूर्ण केले आहे. तिने अत्यंत यशस्वीरीत्या आपले शिक्षण पूर्ण केले आणि आपली निवड सार्थ ठरवली.

हेही वाचा: लसीकरणाचा ‘अमळनेर पॅटर्न’ जळगाव जिल्ह्यात चर्चेत

आता जेथे जगातील मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड होते, अशा ठिकाणी तिची निवड झाली आहे. रुहीच्या निवडीमुळे नाशिकमधील म्हसरूळचे नाव जगाच्या नकाशावर झळकणार आहे. तिच्या या निवडीबद्दल म्हसरूळ परिसरात आनंद व्यक्त केला जात असून, सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुटुंबीय व शिक्षक, गुरुजन यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले असून, यापुढील वाटचालीतही सर्वांचे आशीर्वाद कायम राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत संशोधनात नेहमी अग्रेसर राहण्याचा विश्वास रुही हिने व्यक्त केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikamericamhasrul
loading image
go to top