औरंगाबाद : पाणीपट्टी कपातीचा सव्वा लाख नागरिकांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad One and half lakh citizens benefit from water bill cut

औरंगाबाद : पाणीपट्टी कपातीचा सव्वा लाख नागरिकांना लाभ

औरंगाबाद : शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत पाणीपट्टीत ५० टक्के कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार प्रशासनातर्फे सोमवारी किंवा मंगळवारी प्रस्ताव प्रशासकांसमोर सादर केला जाणार आहे. प्रशासकांची सही झाल्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. शहरात एक लाख २९ हजार निवासी ग्राहक असून, त्यांना पाणीपट्टी कपातीचा फायदा होणार आहे.

शहरातील अनेक भागाला आठ-नऊ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेच्या विरोधात रोष वाढला आहे. वर्षभराची पाणीपट्टी तब्बल चार हजार ५० रुपये महापालिका आकारते. पण पाणी केवळ महिन्यातून चार वेळा म्हणजे ४८ दिवसच देते. त्यामुळे पाणीपट्टी कमी करण्याची मागणी होत होती. त्यानुसार शिवसेनेचे पूर्व विधानसभा मतदारसंघ संघटक राजू वैद्य, आमदार अंबादास दानवे यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी केली होती. काल स्मार्ट सिटी अभियानाच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी पाणीपट्टी ५० टक्के कमी करून दोन हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आता प्रशासकीय ठराव घेतला जाणार आहे. शनिवारी उपायुक्त अपर्णा थेटे, उपायुक्त संतोष टेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होते. सोमवारी किंवा मंगळवारी हा ठराव प्रशासकांच्या मंजुरीसाठी जाईल, त्यानंतर अंमलबजावणी होईल, असे श्रीमती थेटे यांनी सांगितले.

निवासी नळधारकांनाच लाभ!

शहरात महापालिकेच्या रेकॉर्डनुसार सुमारे एक लाख ३५ हजार ५१५ नळधारक आहेत. यातील एक लाख २९ हजार निवासी तर उर्वरित नळधारक व्यावसायिक आहेत. पाणीपट्टी कपातीचा निर्णय फक्त निवासी कनेक्शनला देण्याचा विचार प्रशासन स्तरावर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Aurangabad One And Half Lakh Citizens Benefit From Water Bill Cut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top