Aurangabad : नाथसागरातून ९० हजार क्युसेकने विसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paithan Nathsagar dam water 90 thousand cusec

Aurangabad : नाथसागरातून ९० हजार क्युसेकने विसर्ग

पैठण : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरातून सव्वालाख क्युसेक पाण्याचा सुरु केलेला विसर्ग कमी झाला असला तरी धरणाचे सर्व २७ दरवाज्याच्या सांडव्यातून गोदापात्रात ९० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान गोदाकाठी पाणी पाहण्यासाठी पैठण शहरातील नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी धरण नियंत्रण पातळी स्थिर राहण्यासाठी पाण्याची आवक पाहून एक लाख ३१८ क्युसेक पाणी गोदापात्रात सोडण्याचा निर्णय घेऊन गोदापात्रात पाणी सोडले.

यानंतर आज दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १८) लाखाहून अधिक सुरु असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. हा विसर्ग कमी होत असला तरी ९० हजार क्युसेक असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीच्या पात्रात तुडुंब पाणी दिसत असून गोदावरी दुथडी भरून वाहत आहे.

दरम्यान, रात्री सोडण्यात आलेले गोदावरीचे पाणी पाहण्यासाठी आज गोदावरीच्या काठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धरण नियंत्रण कक्षातील यंत्रणा पाणी पातळीवर विशेष नियंत्रण ठेवून आहेत. दरम्यान, नगर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी ही पैठण शहरातील वाढत्या पाणी परिस्थिती बाबत पालिका यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

नाथसागर धरणातून गोदावरी नदीत मोठा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे गोदाकाठच्या सर्व गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात उतरू नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी, पोलिस पाटील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे.

- प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, ता. पैठण.

Web Title: Aurangabad Paithan Nathsagar Dam Water 90 Thousand Cusec

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..