esakal | औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालय लवकरच होणार सुरू, नागरिकांची होणार सोय
sakal

बोलून बातमी शोधा

Passport

कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्यामुळे ता.२८ मार्चपासून बंद असलेला औरंगाबाद पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालय लवकरच होणार सुरू, नागरिकांची होणार सोय

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद  : कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्यामुळे ता.२८ मार्चपासून बंद असलेला औरंगाबाद पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी मुंबईतील पासपोर्ट विभागाचे प्रादेशिक अधिकारी मनोजकुमार राय आणि औरंगाबाद येथील पोस्ट मास्टर जनरल व्ही.एस. जयशंकर यांच्याशी  चर्चा करुन औरंगाबाद येथे लवकरच पासपोर्ट कार्यालय पुन्हा उघडण्याचे सुचना दिल्या.

बिबट्याच्या हल्ल्‍यात पिता-पुत्र ठार, पैठण तालूक्यातील आपेगाव शिवारात दहशत  


औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालय बंद केल्यामुळे त्रास होत असल्याचे अनेक नागरिकांना थेट खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे तक्रार केली होती. सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खासदार इम्तियाज जलील यांनी तात्काळ संबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन पासपोर्ट कार्यालय पुन्हा उघडण्याचे सूचना दिल्या. पासपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की औरंगाबाद पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी टपाल खात्याकडून मंजुरीची प्रतीक्षा करीत आहेत. टपाल विभाग आणि पासपोर्ट कार्यालयातील दोन्ही अधिकाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना त्वरीत पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

संपादन - गणेश पिटेकर

loading image