esakal | बिबट्याच्या हल्ल्‍यात पिता-पुत्र ठार, पैठण तालूक्यातील आपेगाव शिवारात दहशत  
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या.jpg

पिता-पुत्र त्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. रात्र झाली तरी दोघे ही घरी परत न आल्यामुळे त्यांना  पाहण्यासाठी गावातील लोक शेताकडे गेले. तर धक्कादायक बाब समोर आली. बिबट्याच्या हल्ल्यात दोघेही मृत्यूमुखी पडलेले मृतदेह तेथे आढळून आले.

बिबट्याच्या हल्ल्‍यात पिता-पुत्र ठार, पैठण तालूक्यातील आपेगाव शिवारात दहशत  

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (औरंगाबाद) : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पैठण तालूक्यातील आपेगाव ता. येथील पिता-पुत्र ठार झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी (ता.१६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गोदाकाठच्या परिसरात खळबळ  उडाली असून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशोक सखाहरी औटे (वय ५०) व त्यांचा मुलगा कृष्णा अशोक औटे (वय १६) अशी ठार झालेल्या पितापुत्रांची नावे आहे. 

विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठण तालूक्यातील धक्कादायक घटना 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिता-पुत्र त्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. रात्र झाली तरी दोघे ही घरी परत न आल्यामुळे त्यांना  पाहण्यासाठी गावातील लोक शेताकडे गेले. तर धक्कादायक बाब समोर आली. बिबट्याच्या हल्ल्यात दोघेही मृत्यूमुखी पडलेले मृतदेह तेथे आढळून आले. या घटनेची माहिती पैठण पोलिस ठाण्यात कळविण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेवून घटनास्थळी धाव घेतली. 

पैठणचे नाथमंदिर खुले, भाविकांनी साजरा केला आनंदोत्सव

बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना
यापुर्वी बिबट्याचे आपेगाव शिवाराजवळ असलेल्या गोपेवाडी शिवारात काही काळ वास्तव्य राहिले होते. या काळात (ता. ५ सप्टेंबर २०१८) रोजी बिबट्याने शेतात काम करण्यासाठी गेलेल्या भरत मुरलीधर ठेणंगे या शेतकऱ्यांवर रात्री आठच्या सुमारास हल्ला करुन ठार केले होते. त्यामुळे आता दुसरा हल्ला झाल्याने शेतकरी, ग्रामस्थ घाबरले आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)

go to top