औरंगाबाद : पिंपरखेडा, लाडगाव ग्रामपंचायतीला पुरस्कार

आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर : पदाधिकारी, ग्रामस्थांनी व्यक्त केला आनंद
Aurangabad Pimparkheda Ladgaon Gram Panchayat received RR Patil Beautiful Village Award
Aurangabad Pimparkheda Ladgaon Gram Panchayat received RR Patil Beautiful Village Award sakal

औरंगाबाद : जिल्ह्यात २०२१-२२ या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचा निकाल जाहीर झाला आहे. यात जिल्ह्यातून संयुक्तपणे प्रथम येण्याचा मान पिंपरखेडा (ता. कन्नड) व लाडगाव (ता. औरंगाबाद) या ग्रामपंचायतीने पटकावला आहे. दरम्यान २०२०- २१ या कालावधीमधेही पिंपरखेडा ग्रामपंचायतीने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला होता.

या अभियानात भाग घेणाऱ्या ग्रामपंचायतीस तालुका स्तरावर प्रथम क्रमांकास १० लाख व जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाख पुरस्कार शासनाकडून देण्यात येतो. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या तालुकास्तरीय समितीकडून गुणांकन व मूल्यांकन करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत गाव पाहणी, अभिलेख्यांची व गुणांची पडताळणी करून पिंपरखेडा व लाडगाव हिवरा यांना संयुक्तपणे प्रथम पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

ही योजना राबवण्यासाठी पिंपरखेडाच्या सरपंच उषाबाई अशोक लोखंडे, उपसरपंच शकिनाबी सलीम शहा, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य मीनाबाई पाडसवान, रामसिंग कुरंकार, सागर पंडित, छाया काळे, आयाज बानो शहा, सांडू नाना, बडेमिया लालमिया, अशोक लोखंडे, बाबुदादा पाडसवान, शिवनाथ सोनवणे, गोरक राजपूत, शिवाजी पाडसवान, हरिसिंग पाटील, रामदास लोखंडे, नंदू कुरंकार, तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष सलीम शहा, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष फारुख शहा, गणेश भालकर, हेमराज खोब्रागडे, विलास लोखंडे, आजिनाथ जाधव, रमेश कुरणंकार तसेच इतर विभागाचे सर्व कर्मचारी, महिला मंडळ, युवक मंडळ, गावकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

शंभर गुणांच्या आधारे गुणांकन

दरम्यान पथकाने गावांतर्गत योजना, सुविधा, कर वसुली, वृक्ष लागवड, स्वछता, दप्तरी नोंदी, लोकसहभाग, आरोग्य, शिक्षण, लसीकरण, मूलभूत गरजा, पायभूत सुविधा, जल व वीज वापर आदींची पाहणी केली. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर व लोकसहभाग यावर योजना आहेत. या योजनेत गावांचे स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर असे शंभर गुणांच्या आधारे गुणांकन केले गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com