औरंगाबाद : भावना दुखावणारे कृत्य करू नका : कलवानिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Police Force Meeting

औरंगाबाद : भावना दुखावणारे कृत्य करू नका : कलवानिया

औरंगाबाद : सण, उत्सव साजरा करताना सोशल मीडियासारख्या व्यासपीठावरून आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करू नका, अशा पोस्टवर टिपणी करू नका, कोणाच्याही भावना दुखावतील असे कृत्य करू नका, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी शुक्रवारी (ता. २९) केले. रमजान ईदच्या अनुषंगाने एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात आयोजित समाजातील मुफ्ती, आलीम, हाफीज, मौलवी, धर्मगुरू, लोकप्रतिनिधी, व्यापारी आदींच्या जिल्हास्तरीय मध्यवर्ती शांतता बैठकीत ते बोलत होते.

एसपी कलवानिया म्हणाले, की पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष ठेवावे जेणेकरून त्यांच्याकडून प्रक्षोभक किंवा समाजमन दुखावले जातील अशा आशयाचे मत कोणत्याही माध्यमांतून दिले जाणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक व जातीय भावना दुखावतील असे व्हिडिओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस मेसेज, तयार करून ते पोस्ट, लाईक, शेअर, कमेंट्स, फॉरवर्ड, करून इतरत्र प्रसारित करण्यासारखे कृत्य केल्यास संबंधिताला कलम २९५ भादंवि व कलम ६६ आणि ६७ माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार ३ वर्षेपर्यंत शिक्षा होऊ शकते. धार्मिक उत्सव हे एकोपाने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणादरम्यान केले. प्रास्ताविक अपर अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी केले. सूत्रसंचालन उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल पाटील यांनी केले.

सायबर टीम असेल दक्ष

औरंगाबाद ग्रामीण सायबर पोलिसांची एक टीम बारकाईने सोशल माध्यमांवर लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे या टीमला अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास संबंधिताविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या वारंवार एकेरी बोलणाऱ्यांवर नाराजी

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एसपी मनीष कलवानिया आणि अपर अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांचा अध्यक्षीय भाषणादरम्यान वारंवार मनीष आणि पवन असा वारंवार एकेरी उल्लेख केला. यावेळी उपस्थित समाजातील प्रतिष्ठित आणि पोलिस अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलिस अधीक्षक यांच्यासारख्या अधिकाऱ्याला एकेरी उल्लेख केल्याने नाराजी व्यक्त केली.

Web Title: Aurangabad Police Force Meeting Central Peace Kalwania

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top