औरंगाबाद : पोलिस भरतीतील डमीला पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police

औरंगाबाद : पोलिस भरतीतील डमीला पोलिस कोठडी

औरंगाबाद ः पिंपरी चिंचवड पोलिस भरतीच्‍या लेखी परीक्षेत मूळ परीक्षार्थीच्‍या जागेवर परीक्षा देण्‍यासाठी आलेल्या एका डमी उमेदवाराला करमाड (जि. औरंगाबाद) पोलिसांनी शुक्रवारी (ता. १९) रात्री अटक केली होती. त्याला मंगळवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. व्‍ही. खेडकर यांनी शनिवारी (ता. वीस) दिले.

आकाश सुप्पडसिंग जारवाल (वय २१, रा. जोडवाडी ता.जि. औरंगाबाद) असे डमी उमेदवाराचे नाव आहे; तसेच करण त्रिंबकराव सुंदर्डे (रा. भोकरवाडी, जामखेड ता. अंबड जि. जालना) असे मूळ परीक्षार्थीचे नाव आहे. प्रकरणात करमाड पोलिस ठाण्‍याचे अंमलदार जयसिंग नागलोत यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी पिंपरी चिंचवड पोलिस पोलिस दलासाठी पोलिस भरतीची लेखी परीक्षेसाठी करमाड येथील न्यू हायस्कूल उच्‍च माध्‍यमिक विद्यालय परीक्षा केंद्र होते. त्यावेळी परीक्षार्थी करण सुंदर्डे याच्‍या परीक्षा ओळखपत्राच्या छायाचित्रात तफावत आढळली.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

त्याची विचारपूस केली तेव्हा त्‍याने लावलेल्या मास्‍कमध्‍ये इलेक्ट्रॉनिक तर कानामध्‍ये मायक्रो डिव्इहास सापडले. त्‍याची चौकशी केली असता त्‍याने त्‍याचे नाव आकाश जारवाल असल्याचे सांगितले. प्रकरणात आकाश जारवाल आणि करण सुंदर्डे यांच्‍याविरुद्ध करमाड पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला. जारवाल याला शनिवारी न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी युक्तिवाद केला. गुन्‍हा करणाऱ्या संशयित आरोपींचे मोठे रॅकेट असण्‍याची शक्यता वर्तवून संशयिताकडे सापडलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बाहेरून कोण हाताळत होते, संशयित आरोपीने डिव्हाइस कोठून आणले व त्‍याचा उपयोग आणखी कोठे केला याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

loading image
go to top