esakal | खासदार जलील रुग्णांच्या मदतीला, घाटीला चार हजार सलाईनच्या बॉटल्स दिल्या भेट

बोलून बातमी शोधा

इम्तियाज जलील
खासदार जलील रुग्णांच्या मदतीला, घाटीला चार हजार सलाईनच्या बॉटल्स दिल्या भेट
sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : वाहतुकीच्या अडथळ्यामुळे घाटी रुग्णालयात मिळणारे सलाईन व इतर साहित्य अडकून पडले आहेत. त्यामुळे रुग्णालयात सलाईनचा तुटवडा जाणवत आहे. ही गरज ओळखून गुरुवारी (ता.२९) खासदार इम्तियाज जलील यांनी घाटी रुग्णालयास चार हजार सलाईनच्या बॉटल भेट दिल्या. या प्रसंगी श्री.जलील म्हणाले, की घाटी रुग्णालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालयात गेल्या एक वर्षापासून म्हणजे कौतुक करावे, असे काम डॉक्टर्स कडून करण्यात येत आहे.

हेही वाचा: पंकजा मुंडेंना कोरोनाची बाधा, सोशल मीडियावरून दिली माहिती

डॉक्टर दिवस-रात्र मेहनत करत आहेत. असे करत असताना घाटी रुग्णालयात उपचारासाठी लागणारे काही साहित्य तुटवडा जाणवत आहे. कालच आम्हाला माहीती मिळाली की येथे सलाईनचा तुटवडा जाणवत आहेत. वाहतुकीच्या अडथळ्यामुळे अडचण निर्माण झाली आहेत. त्यामुळे आम्ही आज चार हजार सलाईनच्या बॉटल घाटी रुग्णालयात भेट दिल्या आहेत. यावेळी घाट रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी हरबडे व इतर डॉक्टर उपस्थित होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी डॉक्टरांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या.