esakal | Aurangabad : औरंगाबादेत मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : शहरात बुधवारी (ता. १४) रात्री मुसळधार पाऊस झाला. पुंडलीकनगर रस्‍त्यावरील हे छायाचित्र.

Aurangabad : औरंगाबादेत मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : शहरात Aurangabad बुधवारी (ता. १४) रात्री मुसळधार पावसाने Rain हजेरी लावली. त्यामुळे शहारातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृग नक्षत्र Mrig Nakhatra कोरडे गेल्यानंतर शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र उशीरा का होईना पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी आठ वाजेपासून पावसाची भूरभूर सुरु होती. दुपारनंतर उघडीप घेतलेल्या पावसाने पुन्हा रात्री नऊ वाजेच्या सुमारास हजेरी लावली. जवळपास तासभर जोरदार पाऊस पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. aurangabad rain updates heavy rain in city, roads flooded

हेही वाचा: 'विष्णूपुरी, दुधना'चे दरवाजे उघडले, नाल्यातील नोटांसाठी गर्दी

या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. मृग नक्षत्रात पाऊस येईल, या अपेक्षेवर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, पेरणी झालेल्या परिसरात पाऊस न पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. या पिकांना जीवदान देण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसाने केले आहे.

loading image