esakal | 'विष्णूपुरी, दुधना'चे दरवाजे उघडले, नाल्यातील नोटांसाठी गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प

'विष्णूपुरी, दुधना'चे दरवाजे उघडले, नाल्यातील नोटांसाठी गर्दी

sakal_logo
By
टीम ई सकाळ, विलास शिंदे

नांदेड/सेलू/उदगीर : मागील चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे Rain नांदेड Nanded जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. या वर्षी विष्णुपुरी धरणाचे Vishnupuri Dam पहिल्यांदाच ६, ७, १३ आणि १४ क्रमांकाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज बुधवारी (ता.१४) सकाळपासून ९० हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. प्रशासनाने नदी काठच्या वीठभट्टी, मासेमारी करणाऱ्यांसह गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.water releases from vishnupuri, dudhana dams glp88

हेही वाचा: Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पाऊस

दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु

सेलू (जि.परभणी) : निम्न दुधना प्रकल्प धरणाच्या Lower Dudhna Dam पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (ता.१३) रात्री व बुधवारी (ता.१४) जोरदार पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. यामुळे धरणाच्या १४ दरवाज्यांतून १४,२८० क्युसेसने दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तालुक्यातील Selu लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारपासून जोरदार Parbhani पाऊस पडत असल्यामुळे बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जलाशयात एकूण ८३ टक्के जलसाठा झाला. त्यामध्ये अजून भर पडत आहे. त्यामुळे प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा लवकरच होऊ शकतो. त्यामुळे धरणाचे चौदा दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत. एकूण १४,२८० क्यूसेक्सने दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या खालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विद्युत साहित्य वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे, असे आवाहन पूरनियंत्रण कक्षाने केले आहे. लोअर दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक सुरू झाली असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता सतीश बागले यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली आहे.

हेही वाचा: तरुणाची आत्महत्या, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

उदगीरात नालीत वाहू लागल्या ५०० रुपयांचा नोटा

लातूर Latur जिल्ह्यातील उदगीर Udgir शहरात आज बुधवारी (ता.१४) एका नालीत ५०० रुपयांच्या नोटा वाहत आल्या. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दिसल्याने ज्याला जमेल तशे नोटा उचलल्या. यामुळे उदगीरात खळबळ उडाली आहे. उदगीरातील रघुकुल मंगल कार्यालयाजवळ बुधवारी नालीत वाहत जाणाऱ्या ५०० रुपयांच्या अनेक नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्रभर पाऊस झाला. या पावसाच्या पाण्याने ५०० रुपयांच्या नोटा नाली वाटे वाहून जात असल्याची चर्चा परिसरात ऐकू येत होती. या नोटांची माहिती उदगीर शहर पोलिस ठाण्याला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ५०० च्या काही नोटा ताब्यात घेतल्या. नालीवाटे वाहत असलेल्या नोटा फाटलेल्या होत्या, तर काही चांगल्या स्थितीत होत्या. त्यापैकी नागरिकांनी काही उचलल्या. काही नोटा पोलिसांना सापडल्या. पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांकडून नोटा खऱ्या असल्याचे स्पष्ट केले आहे. सदरील नोटा कोणाच्या? नालीच्या पाण्यासोबत कोठून वाहून आल्या या प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळालेले नाहीत. नोटा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसले.

loading image