esakal | औरंगाबादसह जिल्ह्यातील काही भागांत पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद शहरात हलकासा पाऊस झाला.

औरंगाबादसह जिल्ह्यातील काही भागांत पाऊस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : शहरात (Aurangabad) साधारण दहा ते पंधरा मिनिटे हलकासा पाऊस (Rain) रविवारी (ता.१६) झाला. शनिवारपासून (ता.१५) काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. तसेच उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. या हलक्याशा पावसामुळे थोडासा दिलासा मिळेल. तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) मराठवाड्यात (Marathwada) पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला होता. जिल्ह्यातील ढोरकीन, विहामांडवा, जायकवाडीसह परिसर, अंभईत वाऱ्यासह पाऊस झाला. (Aurangabad Rain Updates Medium Rain In Some Parts Of District)

हेही वाचा: राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावरील हिंगोलीचा तारा निखळला!

दुसरीकडे गंगापुरातही सरी कोसळल्या. उपळी परिसरात पावसामुळे शेतकऱ्यांची चारा व धान्य झाकण्यासाठी धांदल उडाली होती. खुलताबाद व परिसरात वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची दुपारी दोन वाजता हजेरी लावली.